आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरच्या सीमेवरील राजौरीच्या डांगरी भागात अतिरेकी हल्ल्यानंतर लष्कराची सक्रियता वाढली आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना हाय अलर्टवर ठेवले आहे. धुक्याचा फायदा घेत पाकिस्तानकडून घुसखोरी केली जाते. यामुळे नियंत्रण रेषेनजीक पर्वतीय क्षेत्रात अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती केली जात आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी गृह मंत्रालय १८ हून अधिक अतिरिक्त सीआरपीएफ कंपन्या जम्मूला पाठवत आहे. राजौरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मोहंमद असलम यांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय सुरक्षा दलांच्या ज्या तुकड्या राजौरी-पुंछ क्षेत्रात तैनातीसाठी पाठवल्या आहेत,त्या येण्यास सुरुवात झाली आहे. वन आणि अतिसंवेदनशील भागांत तैनाती केली जात आहे.
दुसरीकडे, ग्राम सुरक्ष समितीच्या सदस्यांकडून शस्त्र परत देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस अधिकारी आपआपल्या कार्यक्षेत्रांत ग्राम सुरक्षा समितींच्या सदस्यांना भेटून त्यांनी जमा केलेले शस्त्र त्यांना देत आहेत. ज्यांची शस्त्रे व्यवस्थित काम करत नाहीत, ती बदलून दिली जात आहेत. ग्राम सुरक्षा समित्यातील ज्या सदस्यांना बंदूक चालवण्यात अडचण येत आहे, त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
दुसरीकडे, डांगरी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह आणि भारतीय लष्कराच्या १६ व्या तुकडीचे लेफ्ट. जनरल संदीप जैन यांनी सुरक्षेच्या अंतर्गत रणनीतीवर चर्चा केली आहे.
हल्ल्यासंदर्भात डझनभर लोकांची चौकशी
राजौरीत झालेल्या अतिरेकी हल्ल्याची चौकशी सुरू असून शोध मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी हल्ल्याला जबाबदार लोकांची ओळख पटवली असून डझनभर लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. मात्र, तपास राष्ट्रीय तपास संस्थेेकडे सोपवला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.