आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Warning Of Heavy Rain In Maharashtra And Tamil Nadu. Cyclone In Bay Of Bengal From 7th To 8th May

चक्रीवादळ:महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा, प. बंगालच्या उपसागरामध्ये 7 ते 8 मेपर्यंत चक्रीवादळ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात पावसाळा आणखी काही दिवस मुक्कामी राहू शकताे. ७ ते ९ मेदरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण हाेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी हा इशारा दिला. या चक्रीवादळाला ‘मोचा’ असे नाव देण्यात आले आहे.

या वादळामुळे पूर्व भागातच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये आणखी ४ दिवस पावसाळी वातावरण राहू शकते. दक्षिणेकडील राज्ये आणि उत्तरेकडील डोंगराळ राज्यांमध्येही पाऊस पडेल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डाेंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान बदलू शकते. हवामान खात्याने या तीन राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळ, महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. नाशिक, धुळे, परभणी, बीड व लातूर ह्या जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस झाला.

उत्तराखंडमध्ये ग्लेशियर तुटल्याने केदारनाथकडे जाणारा पादचारी मार्ग बंद
हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये काही ठिकाणी पावसासह बर्फवृष्टी झाली. उत्तराखंडमध्ये भैरव गडेरा, कुबेर गडेरा दरम्यानचा रस्ता केदारनाथच्या दिशेने पदपथावर हिमनग आल्याने तात्पुरता बंद करण्यात आला आहे. बद्रीनाथसह चार धाम यात्रेला जाणाऱ्या लोकांना परत थांबण्यास सांगण्यात आले आहे.