आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modern Anganwadi In The Villages Of Barmer In Rajasthan Are Showing A New Way Of Education | Marathi News

ग्राउंड रिपोर्ट:राजस्थानमध्ये बाडमेरच्या गावांतील आधुनिक अंगणवाड्या दाखवताहेत शिक्षणाचा नवा मार्ग

डीडी वैष्णव. बाडमेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिथे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी झगडावे लागते तिथे मुलांसाठी चांगल्या शिक्षणाचा विचार करणेही कठीण ठरते. मात्र, २०१६ मध्ये वेदांता समूह आणि राजस्थान सरकारने सुरू केलेल्या आधुनिक अंगणवाडी-नंदघरने हा विचार बदलून टाकला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक वसलेल्या खेडेगावांपर्यंत “नंदघर’मुळे मुले आणि महिलांचे आयुष्य बदलत आहे. येथे शिकणारी ३ ते ५ वयोगटातील मुले केवळ शिकतच नाहीत, तर राहणीमान आणि भाषाशैलीतही शहरातील मुलांशी स्पर्धा करतात. बाडमेरच्या ओसाड वाळवंटात वसलेल्या खेड्यांतील १०० नंदघरांत ३२०० मुले शिकत आहेत. आमच्या पथकाने दुर्गम भागातील नंदघरांत जाऊन लोकांच्या जीवनात बदल जाणून घेतला.

नंदघरच्या यशाचे रहस्य या ४ गाेष्टींतून समजेल
1 विजेत स्वावलंबी
: प्रत्येक नंदघर ०.७५ कि.वॅटच्या सौर पात्याद्वारे स्वत:साठी वीजनिर्मिती करते. म्हणजे येथे २४ तास वीज राहते.

2 वाळवंटातही थंड : ४० अंशांपर्यंत तापमानात नंदघर थंड ठेवण्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाने स्नेलपासून भिंती बनवल्या आहेत. त्याचे फायबर शीट उष्णता रोखते.

3 मुलांसाठी ई-लर्निंग : पारंपरिक पद्धतीने शिकवण्याऐवजी ई-लर्निंगवर भर दिला जातो. यामुळे मुले जास्त जोडली जातात व शिकतात.

4 महिलांसाठी कोर्स : मुलांसोबत स्थानिक महिलांनाही सामावून घेतले जाते. आर्थिक स्वावलंबनासाठी छोटी-मोठी कामे आणि प्राथमिक आरोग्य निगेचे प्रशिक्षण दिले जाते.

कवासचे ढुंढा गाव : भिंतीवर लिहिली नवशिक्षणाची अक्षरे
कवासच्या ढुंढा गावात मेघवालांच्या वसाहतीत स्थापन नंदघरात आसपासच्या खेड्यांतील २० मुले येत आहेत. मुलांना शिकवणारी अंगणवाडीताई पीपली देवी स्वत: कोटा मुक्त विद्यापीठातून बीए झाली आहे. सकाळी मुलांचे स्वागत टाळ्या वाजून होते. नंतर खेळ खेळला जातो. नाष्ट्यानंतर टीव्हीवरील कार्टून व कविता दाखवल्या जातात. मुळाक्षरे सोप्या पद्धतीने भिंतीवर रेखाटली आहेत.

धतरवाल्यांची ढाणी : टीव्हीच्या मदतीने शिकताहेत बेरीज, पाढे
बायतूच्या धतरवाल्यांच्या गावातील ५ वर्षीय रिया चौधरी लहानपणापासून गप्प गप्प राहत होती. वडिलांनी तिला नंदघरमध्ये पाठवले. सुरुवातीस एका कोपऱ्यात बसणाऱ्या रियाला अंगणवाडी कार्यकर्ती आशा चौधरीने ई-लर्निंगशी जोडले. टीव्हीवर जंगल बुकसारखे कार्टून दाखवल्यावर ती उत्साहित झाली. एका वर्षाच्या ई-लर्निंगने ती पाढे, बेरीज आणि मुळाक्षरे शिकली.

बातम्या आणखी आहेत...