आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modern Pfizer Discount, So Why Not Us? The Government Should Have Mercy On Us Too Adar Poonawala

परदेशी लसींना सूट:मॉडर्ना-फायझरला सूट, मग आम्हाला का नाही ? सरकारने आमच्यावरही दया करावी- अदार पूनावाला

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायझर आणि मॉडर्नाला कोणत्या सुविधा हव्या आहेत?

फायझर आणि मॉडर्ना लसीनंतर कोव्हिशील्ड लस तयार करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) देखील सरकारकडे कायदेशीर संरक्षणाची मागणी केली आहे. हा कायदा सर्वांसाठी समान असावा. त्यासोबतच जर सरकार परदेशी कंपन्यांना कायदेशीर संरक्षण देत असेल तर आमच्यावरही दया करावी, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले.

कंपनीच्या सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ही सुरक्षा केवळ सीरमलाच हवी नसून देशात लस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कंपन्यांना द्यायला हवी. सीरम देशात अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोव्हिशिल्ड नावाने कोरोनाची लस तयार करीत आहे.

सीरम देशात अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोव्हिशिल्ड नावाने कोरोनाची लस तयार करीत आहे.
सीरम देशात अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोव्हिशिल्ड नावाने कोरोनाची लस तयार करीत आहे.

अनेक देशांनी लस कंपन्यांना या सुविधा दिल्या असून भारतालाही या सुविधा पुरवण्यात कोणतीही अडचण नसल्याचे बुधवारी आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते. ज्या परदेशी कंपन्या आपातकालीन मंजुरीसाठी अर्ज करतात त्यांनाच ही सुविधा मिळू शकते.

फायझर आणि मॉडर्नाला कोणत्या सुविधा हव्या आहेत?
भारत सरकार आणि फायझर-मॉडर्ना यांच्यात लसीच्या कराराबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. दरम्यान, फायझरने आपल्या निवेदनात म्हटले की, लसींच्या पुरवठासंदर्भांत भारत सरकारशी चर्चा सुरु असून लवकरच यावर तोडगा निघणार आहे. हा करार फक्त एका मुद्यावर अडकलेला असून फायझरने अमेरिका, ब्रिटनसमवेत अनेक देशांकडून कायदेशीर संरक्षण मागितले आहे. कारण लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची कायदेशीर त्रुटी असल्यास त्यास कंपनी जबाबदार राहणार नसून यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी कंपन्यांची इच्छा आहे.

लॅबमध्ये तपासणीची गरज नाही : डीसीजीआय
देशात परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी सरकारने नियमांत सूट दिली आहे. डीसीजीअायने याची घाेषणा केली. आता परदेशात तयार लसींना भारतात ट्रायल करण्याची गरज नाही. अर्थात या लसींना परदेशात वापराची मंजुरी मिळालेली असावी. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपतकाली वापराची मंजुरी मिळाली असावी. पण, देशात तयार होणाऱ्या लसीच्या प्रत्येक बॅचच्या नमुन्यांची लॅबमध्ये पूर्वीप्रमाणेच तपासणी होत राहील.

फायझरसह मॉडर्नाच्या लसींचा देशात येण्याचा मार्ग मोकळा
देशात आता अमेरिकन कंपनी फायझर व मॉडर्नाच्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध पुरवठा प्रशासन, ब्रिटनच्या ईएमए, ईके, एमएचअारए आणि जपानच्या पीएमडीएकडून मंजुरी मिळलेल्या लसींना आता भारतात चाचणी वा तपासणीची गरज नसेल.

निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

  • परदेशी लसींना आता देशातील लॅबमध्ये तपासणीची गरज नाही. फक्त दस्तऐवज तपासून लसीकरणाची परवानगी दिली जाईल.
  • देशात तयार होणाऱ्या कोरोना लसीच्या प्रत्येक बॅचच्या नमुन्यांची तपासणी कसौली येथील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीमध्ये हाेईल.
बातम्या आणखी आहेत...