आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला मिळणार चौथी लस:DCGI ने सिप्लाला मॉडर्नाची लस आयात करण्यास दिली मान्यता, सरकार लवकरच करु शकते निर्णयाची घोषणा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉडर्नाला ब्रिजिंग ट्रायलची गरज नसेल

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सिप्लाला मॉडर्नाची लस आयात करण्यास मान्यता दिली आहे. सिपलाने आपत्कालीन वापरासाठी लसीची आयात व विक्री करण्याची परवानगी मागितली होती. सरकार लवकरच या निर्णयाची घोषणा करू शकते.

मोडर्नाकडून सांगण्यात आले आहे की, अमेरिकन सरकारनेही मॉडर्ना कोविड -19 लसीचे डोस ठरवलेल्या संख्येत भारताला डोनेट करण्याची मंजूरीही दिली आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून आपत्कालीन वापरासाठीही कंपनीने मान्यता मागितली आहे.

मॉडर्नाला ब्रिजिंग ट्रायलची गरज नसेल
मॉडर्ना आणि फायझरचा अशा कंपन्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी भारत सरकारला आवाहन केले होते की, त्यांनी आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर होणारी स्थानिक चाचण्यांची गरज भागवावी. लस वापरल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची हानी किंवा जबाबदारी यासारख्या परिस्थितीबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. डीसीजीआयने 1 जून रोजी म्हटले होते की जर मॉडर्नाच्या लसीला प्रमुख देश आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरास मान्यता दिली असेल तर भारतात याला लॉन्चिंगनंतर ब्रिजिंग ट्रायलची गरज भासणार नाही.

फायझर आणि मोडर्ना यांनी अशी अट घातली आहे की जर नुकसानभरपाई मिळाली तरच ते लस भारतात पाठवतील. ही नुकसानभरपाई लस कंपन्यांना सर्व कायदेशीर उत्तरदायित्वापासून मुक्त करते. भविष्यात या लसीमुळे काही गडबड झाल्यास या कंपन्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाऊ शकत नाही.

भारतात आता 3 लस आणि एक पावडर आहे
सध्या, देशातील लसीकरण ड्राइव्हमध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे कोव्हशील्ड आणि भारत बायोटेकचे कोवाक्सिन वापरले जात आहेत. रशियाच्या स्पुतनिक-व्हीलाही भारतात वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोविड रोखण्यासाठी डीआरडीओने 2-डीजी औषध तयार केले आहे. त्याच्या आणीबाणीच्या वापरासही मान्यता देण्यात आली आहे. हे एक पावडर आहे, जे पाण्यात विरघळून दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...