आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Moderna Vaccine Latest News Update; Moderna Vaccine, Moderna Vaccine In India, EU Medicine Agency, EMA; News And Live Updates

कोरोना लसीवर मोठी बातमी:युरोपमध्ये 12-17 वयोगटातील मुलासांठी मॉडर्नाला मिळाली मान्यता; फायझरनंतर मान्यता मिळवणारी ही दुसरी लस

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 वर्षांखालील मुलांवरही चाचणी सुरु

जगभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अशात अनेक देश युद्धपातळीवर लसीकरणाची तयारी करण्यात व्यस्त आहे. सध्या जगात 18 वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. परंतु, लहान मुलांवरील कोरोनाचा धोका वाढत आहे.

अशावेळी जगातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. युरोपमध्ये 12-17 वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाला मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी युरोपीयन मेडिसीन एजन्सीने मे महिन्यात फायझरला मान्यता दिली होती. त्यानंतर मान्यता मिळवणारी ही दुसरी लस आहे.

लसीचे नाव - स्पाईकव्हॅक्स
ईएमएने म्हटले की, या लसीचे नाव स्पाईकव्हॅक्स असून याचा उपयोग 18 वर्षांवरील लोकांसारखाच केला जाणार आहे. 12-17 वर्ष वयोगटातील लोकांना या लसीचे दोन डोस दिले जाणार आहे. यामध्ये 4 आठवड्याचा अंतर असणार आहे.

3,732 मुलांवर चाचणी
ईएमएच्या मते, 12 ते 17 वयोगटातील 3 हजार 732 मुलांवर स्पाईकव्हॅक्स लसीची चाचणी करण्यात आली आहे. याचे निकाल सकारात्मक आले असून प्रत्येकाच्या शरिरात चांगल्या मात्रामध्ये अॅन्टीबॉडी मिळाल्या आहेत.

12 वर्षांखालील मुलांवरही चाचणी सुरु
तर दुसरीकडे, फायझरने 12 वर्षांखालील मुलांवरही चाचणी सुरु केली आहे. यामध्ये पहिल्या स्टडीमध्ये कमीतकमी मुलांना या लसीचे दोन्ही डोस दिले जाणार आहे. फायझरने यासाठी जगभरातील 4 हजार 500 मुलांची निवड केली आहे.

बातम्या आणखी आहेत...