आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:तामिळनाडूतील सरकार चालते केंद्राच्या तालावर, मोदींनी तपास संस्थांचा गैरवापर केला : राहुल गांधी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील एआयएडीएमके सरकार केंद्रातील रालाेआ सरकारच्या तालावर काम करते, त्यांच्या इशाऱ्यावर चालवले जात आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत तामिळनाडूतील निवडणूक प्रचार मोहिमेला सुरुवात झाली. या दौऱ्यात राहुल यांनी रोड-शो केला. त्याचबरोबर दिवसभर विविध कार्यक्रमांतही सहभाग घेतला.

राहुल पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी आम्हाला नियंत्रित करू शकत नाहीत, असे आगामी निवडणुकीत जनता दाखवून देईल. जनताच राज्याचे भवितव्य निश्चित करेल. नागपूर (संघ मुख्यालय) नाही. केंद्राने कृषी कायद्याच्या आडून शेतकऱ्यांकडून सर्वकाही हिसकावण्याची तयारी केली आहे. आता शेतकरी मोठ्या उद्योजकांचे गुलाम होतील. पंतप्रधान मोदी यांनी सीबीआय व ईडीसारख्या संस्थांचा दुरुपयोग केला, असा आरोपही राहुल गांधी केला.

तामिळनाडूत एप्रिल-मेमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. हे लक्षात घेऊन राहुल गांधी ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तिरुपूर, इरोड व करूरसह ५ जिल्ह्यांत ते राहतील. या जिल्ह्यांत सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेचा चांगलाच प्रभाव मानला जातो. याआधी १४ जानेवारीला पोंगलच्या निमित्ताने जल्लीकट्टू कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

द्रमुकने अंतर राखले : काँग्रेसचा जुना मित्र पक्ष द्रमुकने राहुल यांच्या कार्यक्रमांपासून अंतर राखले आहे. अलीकडेच द्रमुकने पुद्दुचेरी निवडणुकीत सर्व ३० जागा स्वबळावर लढवल्या. परंतु त्याबाबत राहुल यांनी काही मत मांडले नाही.

याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेस आघाडीने ३९ पैकी ३८ जागी विजय मिळवला होता. राज्यातील दोन दिग्गज नेते जयललिता व करुणानिधी यांच्या निधनानंतर राज्यातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. देशात विधानसभा निवडणुकीची सगळेच पक्ष तयारी करू लागले आहेत. त्यासाठी मोठ्या पक्षांचे नेत्यांनी संबंधित राज्यांच्या दौऱ्याचा धडाका लावला आहे.

जीएसटीत बदल करू
संपुआचे सरकार सत्तेवर आल्यास जीएसटीच्या नियमांत बदल केले जातील. ते यापेक्षा जास्त प्रभावी असतील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी लघु उद्योजकांच्या प्रतिनिधींना दिले. जीएसटीची फेररचना ही आमची कटिबद्धता आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...