आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम गुरुवारी नव्या इतिहासाचे साक्षीदार बनले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी उभय देशांच्या पंतप्रधानांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांना टेस्ट कॅप प्रदान केली. क्रिकेट थीमवर बनलेल्या गोल्फ कार्ट मैदानावर फेरफटका मारला. तसेच उभय नेत्यांनी आपल्या संघांतील खेळाडूंची भेट घेतली . त्यांच्यासमवेत राष्ट्रगीतही म्हटले. उभय नेत्यांनी प्रेसिडेंट बाॅक्समध्ये बसून अर्धा तास खेळ पाहिला. अल्बनीज यांनी मोदींसोबत सेल्फीही घेतली.
१९४७ मध्ये ऑस्ट्रेलियासोबत पहिला सामना
उभय देशांत क्रिकेट मैत्रीपर्वाचे हे ७५ वे वर्ष आहे. उभय देशांमध्ये पहिला सामना १९४७ मध्ये झाला.
. सन २०२० मध्ये उभय संघ मदतनिधी सामना खेळले होते.यातील रक्कम ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील आग पीडितांना देण्यात आली होती.
गेल्या महिन्यात परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी कर्णधार रोहित शर्माच्या स्वाक्षरीची बॅट ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांना भेट दिली होती.
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १७ मार्च रोजी मंुबईत होणार आहे.
सामन्याप्रसंगी प्रेसिडेंट बाॅक्समध्ये पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची उपस्थिती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.