आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात सोमवारी व्हर्च्युअल बैठक झाली. तीत रशिया आणि युक्रेनमधील युद्धावरही चर्चा झाली. बैठकीत बायडेन यांनी युद्धात होरपळणाऱ्या युक्रेनच्या लोकांना भारताने दिलेल्या मदतीचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील दोन सर्वात मोठी आणि जुनी लोकशाही असलेले देश या रूपात आपण नैसर्गिक सहकारी आहोत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील संबंधात जी प्रगती झाली आहे, तिची कल्पना एक दशकापूर्वीपर्यंत करणे कठीण होते.
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधील बूचा येथे झालेल्या निर्दोष नागरिकांच्या हत्येचा उल्लेख करून म्हटले की, हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. भारत सरकारने त्याचा निषेध केला असून त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून चांगली फलनिष्पत्ती होईल आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी युक्रेन संकटाबाबत भारत सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, मी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींना शांततेचे आवाहन केले.
राष्ट्रपती पुतीन यांना युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. भारताच्या संसदेतही युक्रेनवर सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही युक्रेनमध्ये नागरिकांची सुरक्षा आणि मदत पोहोचवण्यावर भर दिला. आम्ही औषधे आणि इतर साहित्य युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांना पाठवले आहे. बायडेन म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना भेटून मला नेहमीच आनंद वाटतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.