आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Modi Cabinet Meet: PM Narendra Modi Cabinet Meeting On Corona Amphal Cyclone Live News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळ बैठक:अम्फान चक्रीवादळामुळे ओडिशात जोरदार पाऊस; पीएम मोदींच्या नेतृत्वात थोड्याच वेळात केंद्रीय कॅबिनेटची बैठक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत कोरोनासह अम्फाल वादळावर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू होत आहे. या बैठकीमध्ये कोरोना संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि अम्फान चक्रवादळावर उपाय योजना करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. एकीकडे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांपेक्षा अधिक झाला आहे. तर दुसरीकडे, भारतावर सुपर सायक्लोन अम्फान आज संध्याकाळी सुंदरबनजवळ धडकणार आहे.

अम्फानमुळे सिक्कीम, मेघालयातही अलर्ट जारी
कोरोनाच्या संक्रमणामुळे देशात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू आहे. येत्या 31 मे पर्यंत हा लॉकडाउन जारी राहणार आहे. यामध्ये राज्य सरकार आप-आपल्या पद्धतीने रेड झोन आणि इतर झोन ठरवत आहेत. सोबतच, या झोनमध्ये कशा स्वरुपाच्या सवलती आणि सूट दिल्या जातील हे देखील राज्य सरकारांवर सोपविण्यात आले आहे. याच दरम्यान अम्फान चक्रीवादळाचे संकट भारतात येउन ठेपले आहे. यामुळे तटवर्ती भागांमध्ये ताशी 185 किमी वेगाने वारे वाहतील. सोबतच, हवामान विभागाने पश्चिम बंगाल आणि ओडिशासह सिक्कीम आणि मेघालयात अलर्ट जारी केला आहे.

एका लाखांपेक्षा अधिक लोक सुरक्षित स्थळी

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सायक्लोनचे गांभीर्य लक्षात घेता कोलकाता विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या विमानतळावर गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत कुठल्याही हालचाली होणार नाहीत. बुधवारी सकाळपर्यंत ओडिशातील 11 जिल्ह्यात राहणाऱ्या 1 लाख 19 हजार 75 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या सर्वांना शिबीरांमध्ये ठेवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...