आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Cabinet Meeting Update, Airport Privatisation News; Jaipur, Guwahati And Thiruvananthapuram Airport

मोदी कॅबिनेटचे निर्णय:कॉमन एलिजिबिलिटी टेस्टसाठी नॅशनल रिक्रूटमेंट एजेंसी स्थापन होईल; जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळे लीजवर देण्यास मंजूरी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टाफ सेलेक्शन कमीशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आणि इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सर्विस पर्सनलच्या परीक्षा एकत्र होतील

केंद्रीय कॅबिनेटने कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट घेण्यासाठी नॅशनल रिक्रूटमेंट एजेंसी स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट झाल्यास तरुणांची सुविधा होईल. यादरम्यान जावडेकर यांनी सांगितले की, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळांना पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिप अंतर्गत लीजवर देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

कॉमन एलिजिबिलिटी टेस्टचा फायदा काय ?

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी विविध एजेंसी वेगवेगळ्या परीक्षा घेतात. कँडिडेट्सला अनेकदा फी भरावी लागते. तसेच, परीक्षा केंद्रावर पोहचण्यासही अनेकवेळा त्रास होतो. आता यातून सुटका होणार आहे. स्टाफ सलेक्शन कमीशन (एसएससी), रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) आणि इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सर्विस पर्सनल (आयबीपीएस)च्या पुर्व परीक्षा नॅशनल रिक्रूटमेंट एजेंसीकडून एकत्र घेतल्या जातील.

कॉमन एंट्रेस टेस्टच्या मेरिट लिस्ट 3 वर्षे व्हॅलिड असतील

सरकारने सांगितले की, केंद्र सरकारच्या 20 पेक्षा जास्त रिक्रूटमेंट एजंसी आहेत. यातील फक्त 3 एजंसीच्या परीक्षा एकत्र केल्या जात आहेत. मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कॉमन एंट्रेस टेस्टच्या मेरिट लिस्ट 3 वर्षांसाठी व्हॅलिड असतील. यादरम्यान कँडिडेट आपली योग्यता आणि प्राथमिकतेनुसार वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील.

कॅबिनेटचे इतर निर्णय

साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत 10 रुपयांची वाढ करुन 285 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली.

डिस्कॉम्सला त्यांच्या वर्किंग कॅपिटल लिमिटपेक्षा जास्त कर्ज देण्यासाठी पॉवर फायनंस कॉरपोरेशन आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉरपोरेशनला एकदा सुट दिली जाईल.

6 विमानतळांसाठी मागच्या वर्षी अडाणी ग्रुपची बोली मंजूर झाली होती

जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम, लखनऊ, अहमदाबाद आणि मंगळुरूला ऑपरेट करण्यासाठी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अडाणी ग्रुपच्या बोलीला मंजूरी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...