आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगपतींना कर्जमाफी ?:'मोदी सरकारने उद्योगपतींचे 2378760000000 रुपयांचे कर्ज माफ केले'- राहुल गांधी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी ट्विटरवरुन सरकारवर निशाना साधला आहे

भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी असलेले अंबानी आणि अदानी यांचा आणि केंद्रातील भाजप सरकारचे लागेबंधे असल्याचा आरोप अनेक वेळा काँग्रेसकडून होत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच या मुद्दायवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करत असतात. आता परत एकदा त्यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी दावा केला आहे की, यावर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींचे 2378760000000 रुपयांचे कर्म माफ केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, '2378760000000 रुपयांचे कर्ज या वर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींना माफ केले आहे. या रकमेतून कोविडसारख्या संकट काळात 11 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 20-20 हजार रुपये देता आले असते. मोदीजींच्या विकासाचे हे खरे रुप आहे', असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...