आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने 2020-21 मध्ये 12 वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकूण 1,149.10 कोटी रुपयांचे वाटप केले. लोकसभेत अतारांकित प्रश्नाद्वारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मोदी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेतलेल्या पाऊलांचा तपशील मागवला होता.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शिवसेनेचे खासदार राऊत यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, 2020-21 मध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन (एनएफएसएम) साठी 153.36 कोटी, पीएमकेएसवायच्या प्रति बूंद अधिक पीक घटकांच्या योजनेत 400 कोटी, एनएफएसएम (ओएस अँड ओपी)योजनेला 39.38 कोटी रुपये, कृषी मशीनीकरणवर उप मिशन ( एसएमएएम) साठी 77.92 कोटी रुपये, मृदा आरोग्य व्यवस्थापन (एसएचएम) योजनेसाठी 0.46 कोटी रुपये, मृदा आरोग्य कार्ड (एसएचसी) योजनेसाठी 5.69 कोटी रुपये, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 290.88 कोटी रुपये, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (एटीएमए) योजनेसाठी 17.41 कोटी रुपये, आरएडी स्कीमसाठी 10 कोटी, एकात्मिक विकास मिशन फलोत्पादनासाठी (एमआयडीएच) 130 कोटी रुपये, सब-मिशन ऑन अॅग्रो-फॉरेस्ट्री (एसएमएएफ) साठी 2 कोटी आणि परंपरागत कृषी विकास योजनेसाठी (पीकेव्हीवाय) 13 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी देण्यात आलेल्या निधीचा केंद्र सरकारने खुलासा केल्यावर मुंबई भाजपचे प्रवक्ते उदय प्रताप सिंह यांनी ठाकरे सरकारला फटकारले. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने शक्य होईल ती मदत केली आहे हे सिद्ध झाले आहे. परंतु राज्य सरकार स्वतः राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काही करू इच्छित नाही.
5 वर्षांपेक्षा जास्त रक्कम वाटप
पाच वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने 12 योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुमारे 6,353.97 कोटी रुपये वाटप केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.