आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Modi Government Is Developing Rich Friends By 'cleansing' Farmers From Roots, Rahul Gandhi Criticizes Central Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारवर टीका:शेतकऱ्यांना मुळापासून 'साफ' करुन मोदी सरकार श्रीमंत मित्रांचा विकास करत आहे, शेतकऱ्यांसंबंधीत विधेयकावरुन राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 मध्ये काळा शेतकरी कायदा आणल्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला आहे.

संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान रविवारी राज्यसभेत दोन कृषि विधेयके मंजूर करण्यात आली. काँग्रेस आणि विरोधीपक्षांचा या विधेकयाला विरोध आहे. यारवरुन राज्यसभेतील गदारोळ अद्यापही सुरू आहे. दरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना मुळापासून साफ करुन मोदी सरकार श्रीमंत मित्रांचा विकास करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी लावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली. तसेच ते 2015 ला काय बोलले याची देखील आठवण करुन दिली आहे. यानंतर 2020 मध्ये काळा शेतकरी कायदा आणल्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींनी ट्विट करत म्हणाले की, '2014 ला मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP, 2015 ला मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होऊ शकणार नाहीत. आता 2020 मध्ये त्यांनी काळा शेतकरी कायदा आणला. मोदीजींचा हेतू ‘साफ’. नवा कृषीविरोधी प्रयत्न, शेतकऱ्यांना करून समुळ नष्ट, श्रीमंत मित्रांचा मोठा विकास 'असे म्हणत राहुल गांधींनी कृषि विधेयकावरुन केंद्र सरकारव तोफ डागली आहे.

बातम्या आणखी आहेत...