आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नमोरंजन...:गुजरातच्या मनोरंजन पार्कमध्ये मोदी, 1 हजार कोटींच्या पर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन; क्रूझ व टॉय ट्रेनची सफारी

अहमदाबाद/केवडियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाकाळात पंतप्रधान नरेंद्र माेदी प्रथमच गुजरातेत दाखल झाले. त्यांनी केवडियात ९ तासांत स्टॅच्यू आॅफ युनिटी परिसरातील १ हजार कोटींच्या १६ प्रकल्पांचे लाेकार्पण केले. जंगल सफारीच्या उद्घाटनावेळी मोदींनी पोपटांच्या सान्निध्यात वेळ घालवत आनंद लुटला. या आयोजनासाठी स्टॅच्यू क्षेत्रातील २५ किमी परिसर एलईडीने सजवण्यात आला आहे.

येथे लहान मुलांच्या सकस आहारासाठी उपयुक्त असे ३५ हजार चौ. फूट क्षेत्र असलेले पार्कही उभारण्यात आले आहे. येथे मुले अॅनिमेशनद्वारे सकस आहाराबाबत माहिती घेऊ शकतील. परिसरातील आरोग्यवनात १५ एकरांत ३८० प्रकारच्या ५ लाख औषधी वनस्पती आहेत. शनिवारी मोदी सी-प्लेनचे लोकार्पण करतील.