आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Launches Rs 21,000 Crore Projects Today, Prime Minister To Visit Gujarat On June 17

प्रकल्पांचा शुभारंभ:मोदींच्या हस्ते आज 21 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ,17 जून रोजी पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जून रोजी गुजरात राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा असून या दौऱ्यात त्यांच्या हस्ते सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ हाेणार आहे. पावागड येथील श्री कालिकामाता मंदिराचा जीर्णाेद्धार मोदींच्या हस्ते हाेणार आहे. हा कार्यक्रम १८ जून रोजी आयाेजित करण्यात आला आहे. त्याशिवाय ते वडाेदरा येथील गुजरात गाैरव अभियानातदेखील सहभागी हाेतील. त्यांच्या उपस्थितीत २१ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी हाेणार आहे. त्याशिवाय १.३८ लाख घरांच्या प्रकल्पाचा प्रारंभही हाेईल. १८ जून रोजी मोदींच्या आईचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने मोदी आईचे त्यांची भेट घेतील.

बातम्या आणखी आहेत...