आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi On Lockdown Live: Prime Minister Narendra Modi Speaking Live On Covid 19 And Lockdown In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांची घोषणा:18 मे पासून नव्या रुपात लागू होणार लॉकडाउनचा चौथा टप्पा; अर्थव्यवस्थेला भरारी देण्यासाठी 20 लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी कोरोनावर यापूर्वी 19 मार्च, 24 मार्च, 3 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी केले जनतेला संबोधित
  • भारताने संकटाला सुद्धा संधी मानत त्याचे सोने केले, स्वावलंबनाचा संकल्प प्रभावी केला -पीएम मोदी

कोरोनाच्या दुष्टचक्रात आधार देत पंतप्रधान नरंेद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला स्वावलंबी करण्यासाठी अिभयानाची घोषणा केली. यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या १०% आहे. जीडीपी प्रमाणाच्या हिशेबाने हे जगातील ५वे सर्वात मोठे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये सरकारने यापूर्वी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत. सरकारने आतापर्यंत ७.७९ लाख कोटींच्या घोषणा केल्या आहेत. म्हणजे, आगामी काळात १२.२१ लाख कोटींचा हिशोब सांगितला जाईल. पॅकेज प्रामुख्याने एमएसएमई, रोजंदारी मजूर, मध्यमवर्ग व उद्योग क्षेत्रासाठी असेल. पंतप्रधान म्हणाले, की या घोषित पॅकेजमध्ये समाजातील विविध वर्गांना नेमके काय-काय  मिळेल, याची सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारपासून द्यायला सुरू करतील.  

देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की १८ मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा पूर्णपणे नव्या रूपात असेल. नियम निश्चित केले जातील. राज्यांच्या प्रस्तावांवर आधारित ही माहिती १८ मेपूर्वी दिली जाईल. या काळात जनजीवन सामान्य होण्याचे संकेत देत पंतप्रधान म्हणाले, आपले जीवन केवळ कोरोना विषाणूभोवती गंुतून राहू शकत नाही. आपण मास्क वापरू, फिजिकल डिस्टन्सिंग पाळू मात्र आपले ध्येय सोडणार नाही. नियम पाळत आपण कोरोनाशी लढू आणि वाटचाल करू. 

मोदी म्हणाले, ‘‘देशात मांगणी वाढवण्यासाठी तसेच ती पूर्ण करण्यासाठी आपला पुरवठा करणारी साखळी प्रत्येक स्तरावर मजबूत करणे आवश्यक आहे. हीच सप्लाय चेन मजबूत करताना त्यामध्ये या मातीचा आणि येथील मजुरांच्या कष्टाच्या घामाचा सुगंध यायला हवा. कोरोना संकटाचा सामना करताना मी 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे. हे पॅकेज देशाला आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत महत्वाची भूमिका बजावणार आहे." हे भारताच्या जीडीपीच्या तुलनेत 10 टक्के आहे असेही मोदी म्हणाले आहेत.

स्वावलंबनाच्या इमारतीचे पाच खांब 

1. अर्थव्यवस्था : जो वाढीव बदल (इन्क्रीमेंटल चेंज)  नसेल तर लक्षणीय झेप घेऊ

2. पायाभूत सुविधा : जी आधुनिक भारताची ओळख बनेल 

3. प्रशासन व्यवस्था : २१ व्या शतकातील स्वप्ने साकारणारी तंत्रज्ञानावर आधारित असेल. 

4. लोकसंख्याशास्त्र : सर्वात मोठ्या लोकशाहीत लवचिक लोकसंख्याशास्त्र ही आपली शक्ती आहे. 

5. मागणी : आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा चक्र आणि शक्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे आ‌वश्यक आहे.

संकेत : उद्योग-व्यापाराला चालना देण्यासाठी धाडसी पावले, मागणी-पुरवठा साखळी तंत्रज्ञानावर आधारित

  पंतप्रधानांनी व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठ्या सुधारणांचे संकेत दिले. ते म्हणाले, स्वावलंबी भारतासाठी धाडसी सुधारणा करून पावले टाकणे गरजेचे आहे. गेल्या ६ वर्षांत केलेल्या सुधारणांमुळे या संकटात देशातील व्यवस्था सक्षम राहिल्या. अन्यथा सरकारने पाठवलेला पूर्ण पैसा गरीब आणि शेतकऱ्यांच्या खिशात जाईल, असा विचारही कुणी केला नसता. आता या सुधारणा अधिक व्यापक करावयाच्या आहेत. मागणी व पुरवठ्याची साखळी तंत्रज्ञानावर आधारित राहील. सुलभ नियम, उत्तम पायाभूत क्षेत्र, सक्षम मनुष्यबळ आणि भक्कम वित्तीय प्रणालीसाठीही सुधारणा केल्या जातील. 

संकटात स्थानिक उद्योगानेच तारले, आता हाच जीवनमंत्र करा

पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संकटाने आपल्याला स्थानिक निर्मिती, बाजारपेठेचे महत्त्व पटवून दिले आहे. स्थानिकांनीच आपली मागणी पूर्ण केली. आता या स्थानिक क्षेत्रालाच जीवनमंत्र म्हणून स्वीकारावे लागेल. आज जे ग्लोबल ब्रँड आहेत ते कधी काळी लोकल होते. त्या लोकांनी त्याचा वापर आणि प्रचार केला आणि ते प्रॉडक्ट ग्लोबल झाले. म्हणूनच आता लोकलचा प्रचार करावा लागेल. 

उद्योग क्षेत्र, असंघटित कामगार यांच्यासाठी असतील नव्या घोषणा

आर्थिक पॅकेजमुळे विविध सामाजिक घटक व अर्थव्यवस्थेच्या साखळीला आधार मिळेल. यात लँड, लेबर, लिक्विडिटी व लॉवर भर दिला जाईल. पॅकेजमध्ये कुटीर उद्योग, गृह उद्योग व एमएसएमईवर लक्ष असेल. एमएसएमईवर ११ कोटी लोक अवलंबून आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगार, हातगाडे-फेरीवाल्यांसाठी घोषणा असतील.

भारताने संकटालाही संधीत बदलले

भारताने संकटाच्या घडीला देखील संधीत परिवर्तित केले असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘‘मी एका उदाहरणातून आपले म्हणणे मांडत आहे. जेव्हा कोरोना संकटाची सुरुवात झाली तेव्हा आपल्या देशात पीपीई किट बनत नव्हते. एन-95 मास्क सुद्धा भारतात नाममात्र म्हणून उत्पादित केले जात होते. आज घडीला भारतात रोज दोन लाख पीपीई किट आणि 2 लाख एन-95 मास्क तयार होत आहेत. आम्ही हे करू शकलो कारण, भारताने संकटाला संधीत बदलले. असे केल्याने भारताचा स्वावलंबनाचा संकल्प आणखी प्रभावी होणार आहे."

देशात लॉकडाउनचा सध्या तिसरा टप्पा

कोरोना संकटामुळे देशात सध्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत, दुसऱ्या टप्प्यात 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात 17 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला.

मोदींनी कोरोनावर यापूर्वी चार वेळा केले देशाला संबोधित

पहिला संवादः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मार्च रोजी पहिल्यांदा देशवासियांशी कोरोनावर संवाद साधला होता. तसेच देशाला संबोधित करताना त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. मोदींच्या आवाहनावरूनच 22 मार्च रोजी देशभर सर्वच बंद ठेवण्यात आले होते. तसेच संध्याकाळी लोकांनी आपल्या घरातून घंटानाद करत कोरोना विरुद्ध लढणाऱ्या पोलिस, डॉक्टर, नर्स आणि प्रशासनाला प्रोत्साहित केले होते.

दुसरा संवादः पीएम मोदींनी 24 मार्च रोजी पुन्हा जनतेला संबोधिक करताना 25 मार्च पासून 14 एप्रिल पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी लोकांना घरातच राहून लक्ष्मण रेषा पाळण्याचे आवाहन केले होते.

तिसरे संबोधनः मोदींनी यानंतर 3 एप्रिल रोजी एक व्हिडिओ संदेश जारी करून जनतेशी संवाद साधला होता. यामध्ये त्यांनी लोकांना 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटाला मेणबत्या, टॉर्च आणि दिवे लावून कोरोना वॉरिअर्सचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले होते.

चौथे संबोधनः पंतप्रधानांनी 14 एप्रिल रोजी पुन्हा देशाला संबोधित केले. तसेच 'जान है तो जहान है' असे म्हणत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...