आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी पीयूष गोयलच्या घरी केली गणेश पूजा:पीएम पिवळा कुर्ता-शॉलमध्ये दिसले; मनु सिंघवी, स्वप्न दास गुप्ताही होते हजर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बुधवारी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या घरी जाऊन गणेश पूजन केले. त्यांनी आरतीही केली. यावेळी मोदींनी हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. त्यांच्या खांद्यावर शॉलही होती. यावेळी अभिषेक मनु सिंघवी व स्वप्नदास गुप्ताही हजर होते. या सोहळ्याचा व्हिडिओ पीएमओने यूट्यूबवर शेअर केला.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी गणेश पुजनाच्या छायाचित्रासह संस्कृतमधील एक श्लोक पोस्ट केला होता. त्यांनी लिहिले होते - 'गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. भगवान गणेशाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो.'

राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनीही देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट केले -गणेश चतुर्थीच्या देशवासियांना शुभेच्छा. विघ्नहर्ता व मंगलमूर्ती भगवान गणेश ज्ञान, सिद्धि व सौभाग्याचे प्रतीक आहे. त्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांतता व समृद्धीचा संचार होवो, अशी माझी कामना आहे.

9 सप्टेबरपर्यंत चालणार गणेशोत्सव

संपूर्ण देशात 31 ऑगस्ट रोजी 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. हा उत्सव 9 सप्टेबरपर्यंत सुरू राहील. देशातील बहुतांश घरे, सोसायट्या, दुकाने व कार्यालयांत गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...