आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरोजपूर येथील सभा रद्द करण्यात आली. पंतप्रधानांचा ताफ्यासमोर शेतकरी आले असताना त्यांचा ताफा 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आला. यानंतर विमानतळावर पोहोचलेल्या मोदींनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी परत गेल्यानंतर बठिंडा विमानतळावर पोहोचले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, मोदींनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. "मी विमानतळापर्यंत जिवंत पोहोचलो. आपल्या मुख्यमंत्र्यांना जाऊन माझा धन्यवाद म्हणाल!"
तर दुसरीकडे पंतप्रधानांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवल्यानेच त्यांना परत जावे लागले अशा प्रकारचे ट्विट किसान एकता मोर्चाने केला. एवढेच नव्हे, तर पंजाबच्या लोकांनी मोदींच्या सभेला प्रतिसाद दिला नाही. असेही या ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे. सोबतच, रिकाम्या खुर्च्यांचा एक फोटो सुद्धा जारी करण्यात आला आहे.
स्मृती इराणी संतप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा कोणत्या दिशेतून येणार याची माहिती लोकांना कुणी दिली? असा थेट सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. एवढेच नव्हे, तर हा काँग्रेसचा षडयंत्र होता असा आरोपही त्यांनी केला आहे. वैर नरेंद्र मोदींशी आहे. मग तुम्ही देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध षडयंत्र कसा काय रचू शकता असेही इराणी यांनी म्हटले आहे. स्मृती इराणी यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषद घेऊन पंजाब सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
जेपी नड्डा म्हणाले- हा काँग्रेसचा षडयंत्र
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही या घटनेसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. पंजाबचे काँग्रेस सरकार विकासाला विरोध करतात. त्यांना स्वातंत्र्यसैनिकांची सुद्धा किंमत नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा पंतप्रधानांच्या सुरक्षेत कसूरचा विषय होता. आंदोलकांना पंतप्रधानांच्या रूटवर येण्याची परवानगी दिलीच कुणी? पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांनी एसपीजींना आधीच चोख सुरक्षा बंदोबस्त राहणार असे आश्वासन दिले होते. या प्रकरणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा फोनवर बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. असेही नड्डा यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.