आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मोदी जगातील सर्वात लोकप्रिय शासक, अमेरिकी फर्म मॉर्निंग कन्सल्टच्या पाहणीतील दावा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजचे स्टार्टअप उद्याच्या बहुराष्ट्रीय कंपन्या : मोदी

अमेरिकेतील फर्म मॉर्निंग कन्सल्टने अलीकडे केलेल्या पाहणीच्या निष्कर्षानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय शासक ठरले आहेत. केंद्रात सरकार चालवणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय असल्याचे म्हटले आहे.

पाहणीत ७५ टक्के लोकांनी मोदींना जगातील सर्वात लोकप्रिय शासन प्रमुख मानले आहे. २० टक्के लोकांनी त्याबद्दल असहमती दर्शवली. त्यामुळेच मोदींच्या बाजूने शुद्ध रूपाने ५५ टक्के लोकांचा कौल असल्याचे मानले गेले. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांना केवळ २४ टक्के लोकांनी लोकप्रिय मानले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना उणे गुणांकन मिळाले. त्यांना लोकप्रिय शासन प्रमुख म्हणून मान्यता देऊ नये असे मत असलेल्यांची संख्या जास्त होती. ही पाहणी अमेरिका, ब्राझील, जपान, भारत, ब्रिटन, जर्मनीसह १३ देशांत करण्यात आली होती.

हा निकाल समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्पण मोठे आहे. त्यामुळेच ते लोकप्रिय नव्हे तर प्रत्येक वर्ग, संप्रदाय, समुदायात ती वाढली आहे, असे नड्डा यांनी सांगितले. मोदी दूरदर्शी नेते आहेत. त्यांच्या दुरदर्शितेमुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीशी भारत प्रभावीपणे लढू शकत आहे. ही गोष्ट ९० टक्क्यांहून जास्त भारतीय मानतात, असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

आजचे स्टार्टअप उद्याच्या बहुराष्ट्रीय कंपन्या : मोदी
नवी दिल्ली : बहुतांश स्टार्टअप देशाच्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शहरात येत आहेत. आजचे स्टार्टअप उद्याच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. शेतीपासून अंतराळापर्यंत स्टार्टअपसाठी मोठा वाव आहे. म्हणूनच व्यवस्थापन विषयाचे अध्ययन अधिक सखोलपणे करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. आेडिशातील संबलपूरमध्ये आयआयएमच्या स्थायी परिसराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला व्हिडिआे कॉन्फन्सिंगद्वारे मोदींनी शनिवारी मार्गदर्शन केले होते. व्यवस्थापनाचा विषय केवळ मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी जोडलेला नाही. कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी भारताने व्यापक प्रमाणात पीपीई किट व मास्कच्या निर्मितीला सुरुवात केली. केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यासाठी स्थायी मार्ग काढला आहे. देशात ९८ टक्के भागाला गॅसचा पुरवठा होताे. अशाच प्रकारे सर्व विषय व्यवस्थापनाच्या अध्ययनाशी जोडता येईल.

बातम्या आणखी आहेत...