आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi To Launch Nutrition Schemes For Women; Public Meeting On 18th In Vadodara, Gujarat

योजनांची सुरुवात:महिलांसाठी पोषण योजनांचा मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ; गुजरातच्या वडोदरात १८ रोजी जाहीर सभा

वडोदरा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात सरकारच्या महिला तसेच बालकांच्या पोषणात सुधारणेसाठी दाेन योजनांची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हो णार आहे. गरोदर महिला व बालकांना त्याचा लाभ मिळणार आहे. १८ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी मोदींची जाहीर सभाही हो णार आहे.

मोदींच्या हस्ते मुख्यमंत्री माताेश्री योजना व पोषण सुधा योजनांचा प्रारंभ हो णार आहे. मुख्यमंत्री माताेश्री योजनेअंतर्गत गरोदर महिला व बालकांना १ हजार दिवसांत पोषक पदार्थाचा पुरवठा केला जाणार आहे. कारण राज्यातील महिलांमध्ये गरोदरपणाच्या काळात कुपोषण वाढते. त्यातून मातेचे आरोग्य बिघडते. बालकाच्या आरोग्याला धाेका निर्माण हो ताे. त्यामुळेच सरकारने ही योजना लागू करण्याचे ठरवले आहे.

आदिवासींचाही विचार :
पोषण सुधा योजनेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते हो ईल. ही पथदर्शी योजना म्हणून १० आदिवासी तालुक्यांत राबवली जाणार आहे. त्यात दाहो ड, वलसाड, महिसागर, छाेटा उदेपूर, नर्मदा यांचा समावेश आहे. ही योजना यशस्वी झाल्यास तिचा १४ आदिवासी जिल्ह्यांत विस्तार केला जाणार आहे. त्याशिवाय एकूण १०६ तालुक्यांत ही योजना लागू हो ईल.

बातम्या आणखी आहेत...