आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Modi Will Be Involved Through Video Conferencing; Can Give Information On Vaccine To Opposition Parties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर आज सर्वपक्षीय बैठक:मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून होणार सहभागी, विरोधीपक्षाला देऊ शकतात लसीची माहिती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी लस कंपन्यांना सांगितले - लोकांना सोप्या शब्दात सांगा

कोरोनाच्या मुद्यावरुन सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लस कंपन्यांशी चर्चेनंतर मोदींची ही पहिली महत्त्वाची बैठक आहे.

मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल हेदेखील यात सहभागी होणार आहेत. दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनात मर्ज करण्याची चर्चा होत असताना ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मोदींनी लस कंपन्यांना सांगितले - लोकांना सोप्या शब्दात सांगा
मोदी कोरोनाच्या स्थितीसोबतच लसीच्या विकासावरही सातत्याने लक्ष ठेवून आहेत. 30 नोव्हेंबर रोजी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी यांच्या टीमशी चर्चा केली. लसीच्या परिणामांसारख्या गोष्टी सर्वसामान्यांना सोप्या भाषेत पटवून देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला.

यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी लसीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट, अहमदाबादमधील जायडस बायोटेक पार्क आणि हैदराबादमधील भारत बायोटेक फॅसिलिटीचा दौरा केला होता.

काँग्रेसचे हे नेते सहभागी होऊ शकतात
काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आजाद
TMCचे सुदीप बंदोपाध्याय आणि डेरेक ओ’ब्रायन
बीजू जनता दलाचे चंद्रशेखर साहू
YSRCP चे विजयसाई रेड्डी आणि मिथुन रेड्डी
AIMIM चे इम्तियाज जलील
शिवसेनेचे विनायक राउत
जदयूचे आरसीपी सिंह
अन्नाद्रमुकचे नवनीत कृष्णन
द्रमुकचे TRK बालू आणि तिरुचि शिवा
जेडीएसचे एचडी देवगौड़ा
राकांपाचे शरद पवार
सपाचे रामगोपाल यादव
बसपाचे सतीशचंद्र मिश्रा
राजदचे प्रेमचंद्र गुप्ता
TDP चे जयदेव गल्ला
AAP चे संजय सिंह
TRS चे नाम नागेश्वर राव
लोक जनशक्ति पार्टीचे चिराग पासवान
अकाली दलचे सुखबीर बादल

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser