आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • PM Modi Video Conferencing With Chief Ministers Today For The 5th Time News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनवर चर्चा:मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; महाराष्ट्र, तेलांगाणा, पंजाब आणि बंगाल सरकारने केली लॉकडाउन वाढवण्याची मागणी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रविवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांशी चर्चा केली
 • कामगारांच्या घरवापसीबाबत अनेक राज्यांनी तक्रारी केल्या, कामगारांच्या स्थलांतरामुळे संक्रमण वाढले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे बैठक घेतली यादरम्यान प्रवासी मजुरांवर चर्चा झाली. यावेळी तेलांगाणा, महाराष्ट्र, पंजाब आणि पश्चिम बंगाल सरकारने लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे.

तेलांगाणा आणि तमिळनाडु सरकारने म्हटले तुर्तास ट्रेन आणि विमान सेवा सुरू केल्या जाऊ नयेत. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या हे संक्रमण शहरी भागात पसरले आहे. हे गावात पोहचू न देणे, हा सर्वात मोठे आव्हान आमच्यापुढे आहे.

मुख्यमंत्री मोदींना काय म्हणाले?

 • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, अर्थिक कामकाज सुरू करण्यासाठी राज्यांकडे परवानगी द्यावी. राज्य ठरवणार की, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन कोणते असतील. पुढे म्हणाले की, मनरेगा अंतर्गत 200 दिवसांची मजुरी दिली जावी. ट्रेन,विमान, बस सेवा राज्यांसोबत चर्चा केल्यानंतरच सुरू करावी.
 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, सध्या देशभरात कोरोना महामारी पसरली आहे. अशा वेळी केंद्राने राजकारण करू नये. आम्ही एक राज्य म्हणून, या व्हायरसचा सामना करत आहोत. अशा महत्वाच्या वेळी केंद्राने राजकारण बाजुला ठेवावे. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमा आणि इतर मोठ्या राज्यांना जोडलेले आहोत, म्हणून काही त्रासदेखील आम्हाला सहन करावा लागत आहे. केंद्राने कोणताही भेदभाव न करता, एकजुटीने काम करावे.’’
 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी लॉकडाउन संबंधी ठोस निर्देश द्यावेत. मुंबईत महत्वाच्या गोष्टींसाठी लोकल सुरू करण्याची परवानगी द्यावी.
 • पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले की, लॉकडाउन वाढवला जावा. परंतू, यासाठी ठोस रणनिती आखली जावी आणि राज्यांना आर्थिक पाठबळ दिले जावे.
 • तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, चेन्नई-दिल्लीदरम्यान 12 मेपासून ट्रेन सुरू केली जात आहे. चेन्नईमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 31 मे पर्यंत राज्यात ट्रेन किंवा विमान प्रवास सुरू करू नये.

तमिळनाडुचे सीएम म्हणाले- 31 मे पर्यंत हवाई प्रवास सुरू करू नये

तमिळनाडूचे सीएम पलानीसामी यांनी 31 मे पर्यंत हवाई आणि ट्रेव प्रवास सुरू न करण्याची अपील केली आहे. यादरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच, तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी अपील केली की, पॅसेंजर ट्रेन सर्विस सुरू करू नये. 

सरकारने राजकारण करू नये- ममत बॅनर्जी

बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सध्या देशभरात कोरोना महामारी पसरली आहे. अशा वेळी केंद्राने राजकारण करू नये. आम्ही एक राज्य म्हणून, या व्हायरसचा सामना करत आहोत. अशा महत्वाच्या वेळी केंद्राने राजकारण बाजुला ठेवावे. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमा आणि इतर मोठ्या राज्यांना जोडलेले आहोत, म्हणून काही त्रासदेखील आम्हाला सहन करावा लागत आहे. केंद्राने कोणताही भेदभाव न करता, एकजुटीने काम करावे.’’ दुसरीकडे, तमिळनाडुचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी 31 मे पर्यंत ट्रेन आणि हवाई प्रवास सुरू न करण्याची मागणी केली.

बैठकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोग्य सेतू अॅपच्या वापरावर भर दिला. ते म्हणाले की, नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे.

कॅबिनेट सचिवांची सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांशी चर्चा

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी रविवारी राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांशी चर्चा केली. गौबा म्हणाले की, आज राज्य सरकारांनी आर्थिक कामकाज सुरु करण्यावर भर द्यायला हवा. सरकार स्थलांतरितांसाठी कामगार विशेष रेल्वे चालवत आहे. यासाठी सर्व राज्यांनी अधिकाधिक सहकार्य करावे आणि वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी मदत करावी. 

अनेक राज्यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनवर प्रश्न उपस्थित केले

सुत्रांनुसार, कॅबिनेट सचिवांशी चर्चेत अनेक राज्यांनी राग, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये बनवलेल्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. काही राज्यांनी स्थलांतरितांच्या परतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ही राज्ये म्हणतात की परप्रांतीयांच्या परताव्यामुळे कोरोनाव्हायरसची प्रकरणे वाढत आहेत, अशा परिस्थितीत, ग्रीन झोनमधील भाग लवकरच रेड झोनमध्ये रुपांतरित होतील. 

लॉकडाऊन तीन वेळा वाढला आहे

पंतप्रधान मोदींनी 25 मार्चपासून सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केला. पहिला लॉकडाउन 21 दिवसांसाठी लागू करण्यात आला होता. तो 14 एप्रिल रोजी संपणार होता. त्यानंतर लॉकडाउन 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. 3 मे रोजी बंद होणारा लॉकडाउन पुन्हा 14 दिवसांनी वाढविण्यात आला आहे. आता लॉकडाउन 17 मे रोजी संपणार आहे. 

सोमवारी, मोदी 51 दिवसांत पाचव्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली आहे. त्यांनी 20 मार्च, 2, 11 आणि 27 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा केली होती. 

बातम्या आणखी आहेत...