आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Modi Will Do 'Mann Ki Baat' For 67th Time Today, Can Discuss Precautions In Festivals Coming In The Corona Period

मन की बात:कारगिल दिवसावर पंतप्रधान म्हणाले - पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय सैन्याच्या शौर्याचा विजय झाला

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी म्हणाले - युद्ध केवळ मैदाना लढले जात नाही, आज काल काही सोशल मीडिया पोस्ट देशाचा आत्मविश्वास कमी करते
  • मोदी म्हणाले - मास्क लावल्याने त्रास होत असेल तर कोरोना वॉरियर्सची आठवण काढा, ते तासंतास पीपीई किट घालून आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 67 व्या वेळी मन की बात कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित करीत आहेत. कारगिल युद्धाला 21 वर्षे पूर्ण झाल्यावर या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांची त्यांनी आठवण करून दिली आणि श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान म्हणाले- आज कारगिल विजय दिन आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांच्या शौर्याचा विजय झाला.

पंतप्रधान म्हणाले- तो दिवस सर्वात मौल्यवान क्षणांपैकी एक आहे. सोशल मीडियावर लोक आपल्या वीरांना सलामही करीत आहेत. सर्व देशवासीयांच्या वतीने मी अशा वीरांना जन्म देणाऱ्या त्या धाडसी मातांना नमन करतो.

सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे देशाचे मनोबल कमी होते
मोदी म्हणाले- कारगिल युद्धाच्या वेळी वाजपेयीजींनी लाल किल्ल्यावरुन गांधीजींच्या मंत्रांची आठवण करून दिली होती. जर एखादा अडचणीत असेल तर त्याने भारतातील असहाय्य गरी व्यक्तीविषयी विचार करायला हवा. कारगिलने आम्हाला दुसरा मंत्र दिला आहे. आपण असा विचार केला पाहिजे की आपले हे पाऊल दुर्गम डोंगरांमध्ये आपला प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकास अनुकूल आहे.

आपण करीत असलेल्या विचारसरणीचा सीमेवरील सैनिकांच्या मनावर खोल परिणाम होतो. आपण असे राहायला पाहिजे की, ज्यामुळे सैनिकांचे मनोबल वाढेल. कधी-कधी आपण सोशल मीडियावर अशा गोष्टी फॉरवर्ड करतो, ज्यामुळे देशाचे मनोबल कमी होते. आजकाल केवळ मैदानातच युद्ध लढले जात नाही.

आपल्याकडे कोरोना मृत्यू इतर देशांपेक्षा कमी आहे

गेल्या काही महिन्यांमध्ये देशाने कोरोनाशी लढा दिला आहे, हे कौतुकास्पद आहे. आज आपल्याकडे कोरोना मृत्यू दर जगातील इतर देशांपेक्षा खूप कमी आहे. एकाही व्यक्तीचा मृत्यू होणे हे दुःखद आहे, पण मृत्यूची संख्या आपण कमी केली. सुरूवातीला कोरोना जेवढा घात होता, तेवढाच आताही घातक आहे.

चेहऱ्यावर मास्क, दोन फूटांचे अंतर, कुठेही न थुंकणे, या गोष्टींकडे लक्ष ठेवायचे आहे. हेच आपला कोरोनापासून बचाव करु शकते. कधी-कधी मास्कमुळे आपल्याला त्रास होतो. यावेळी कोरोना वॉरियर्सला आठवा. ते तासंसात किट घालून असतात. एकीकडे आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, तर दुसरीकडे व्यवसायाला उंचीवर न्यायचे आहे.

लोक संकटाचे रुपांतर संधीत करत आहेत

योग्य दृष्टीकोन असेल तर संकटाचे संधीत रुपांतर केले जाऊ शकते. आपण कोरोनाच्या काळत बघत आहोत की, लोकांनी टॅलेंटच्या जोरावर नवीन उद्योग सुरू केले आहे. बिहारमध्ये लोकांनी मधुबनी पेंटिंगचे मास्क बनवणे सुरू केले आहे. आसामच्या कारागिरांनी बांबूचे टिफिन आणि बॉटल बनवणे सुरू केले आहे. हे इकोफ्रेंडलीही असते. झारखंडच्या परिसरात काही समूह लेमनग्रासची शेती करत आहेत. याच्या तेलाची आजकाल मागणीही आहे. दोन्ही ठिकाणी हजारो किमी अंतरावर आहे. मात्र भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.

रक्षाबंधनाला आता लोकलला वोकल करा

काही दिवासंनंतर रक्षाबंधन येत आहे. अनेक संस्था यावेळी विविध प्रकारचे अभियान चालवत आहे. लोकपासून वोकलविषयी बोलले जात आहे. हेच करणे चांगले राहिल. नॅशनल हँडीक्राफ्ट दिवसही येत आहे. आपण याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे, यासोबतच जगालाही सांगायचा आहे. आपले हँडलूम खुप पोटेंशियल आहे. याचा आपल्या लोकल कामगारांना फायदा होईल.