आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Modi Will Inaugurate The New Supreme Court Building In Mauritius Today, Ready With The Help Of India

मॉरिशसला भारताची भेट:पंतप्रधान मोदी आज मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे करणार उद्घाटन, भारताच्या मदतीने केली आहे तयार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजधानी पोर्ट लुईस येथे मॉरीशसच्या सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत भारताच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे
  • 2016 मध्ये भारताने मॉरीशसला 35.3 कोटी डॉलर्सचा विशेष आर्थिक पॅकेज दिले होते, यामुळे येथे अनेक सुविधा तयार होत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मॉरिशसच्या सुप्रीम कोर्टच्या नवीन बिल्डिंगचे व्हिडिओ कॉन्फ्रेंसिगच्या माध्यमातून उद्घाटन करतील. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात कोर्टचे जज, कायदे विभागाचे अधिकारी आणि दोन्ही देशांचे अनेक नामांकित लोक सहभागी होतील. कोर्टाची नवीन बिल्डिंग राजधानी पोर्ट लुईसमध्ये बनवण्यात आली आहे. ही तयार करण्यासाठी भारतानेही मदत दिली आहे.

2016 मध्ये भारताने मॉरिशसला 35.3 कोटी डॉलरचे विशेष आर्थिक पॅकेज दिले होते. यामधून येथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जात आहे. सुप्रीम कोर्टची नवीन बिल्डिंग याचाच एक भाग आहे. 100 बेडचे एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलही तयार केले जात आहे.

मोदींनी मॉरिशसच्या मेट्रो परियोजनेचेही उद्घाटन केले होते

2019 मध्ये मोदींनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत तेथील मेट्रो एक्सप्रेस आणि एका रुग्णालयाच्या प्रोजेक्टचा शुभारंभ केला होता. भारताच्या मदतीने तयार केली जात असणाऱ्या मेट्रो परियोजनेनुसार सप्टेंबर 2019 मध्येच 12 किमी. लाइन अंथरण्यात आली आहे.