आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Modi Will Talk To DMs Of 40 Low Vaccination Districts; CMs Of Maharashtra And Northeast States Will Be Present

मोदींचा व्हॅक्सिन मंत्र:'हर-घर टीका, घर-घर टीका' वर लक्ष केंद्रीत करा, 100 टक्के लसीकरण केलेल्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांकडून सल्ला घ्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी बैठकीत पंतप्रधान मोदी यांना शहरातील रसीकरणाविषयी माहिती दिली. - Divya Marathi
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी बैठकीत पंतप्रधान मोदी यांना शहरातील रसीकरणाविषयी माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लसीकरणात मागे असणाऱ्या 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी म्हणजेच DM सोबत बैठक केली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश होता.

व्हर्च्युअल बैठकीत मोदींनी कमी लसीकरणाच्या कारणांचा आढावा घेतला. लसीकरणाचा मंत्र देत मोदी म्हणाले की, आपल्याला 'हर-घर टीका, घर-घर टीका' वर लक्ष केंद्रित करायचे आहे. बिरसा मुंडा यांची जयंती जवळ येत आहे. त्यापूर्वी संपूर्ण आदिवासी भागात वातावरण निर्माण करायचे आहे. आपण त्यांना अशा काही भावनिक गोष्टींशी जोडणार आहोत, जेणेकरून आदिवासी समाजात लसीकरणाचा रेकॉर्ड होईल.

औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजच्या व्हिडियो कॉन्फरन्स बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पाऊले प्राधान्याने उचलत आहोत याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वाढवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले.

मोदींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

 • आपापल्या जिल्ह्यांमध्ये नवनवीन इनोवेटिव्ह आयडिया अवलंबवा. नवीन-नवीन तंत्रज्ञानांनीच फायदा मिळेल.
 • ज्या जिल्ह्यांनी 100% उद्दिष्ट गाठले आहे त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सल्ला घ्या.
 • सूक्ष्म-कंटेनमेंट झोन तयार करून संसर्गाचा वेग थांबवला जाऊ शकतो.
 • विशेष शिबिर उभारण्याची कल्पना चांगली आहे. 20-25 लोकांची टीम तयार करून तुम्ही हे करू शकता.
 • NCC, NSA सहकाऱ्यांची जास्तीत जास्त मदत घ्या. ध्येयपूर्तीसाठी त्यांची मदत लाभदायक ठरेल.
 • लसीकरण कार्यक्रमात अधिकाधिक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करा. त्यांना 5-7 दिवस कामावर रुजू करून घेतल्यानंतरच तुम्हाला फरक कळायला लागेल.
 • जास्तीत जास्त लोकांना जागरूक करा. लोकांची मदत घ्या. त्यांचे छोटे व्हिडिओ बनवा. धार्मिक नेत्यांचे व्हिडिओ पोस्ट करा.
बातम्या आणखी आहेत...