आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election 2021
  • Modi Worships At The Matua Community Temple In Bangladesh, Interacts; Mamata Alleged That This Was A Violation Of The Code Of Conduct News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा बांगलादेश दौरा:मोदींची बांगलादेशातील मतुआ समुदायाच्या मंदिरात पूजा, संवाद साधला; हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा ममतांचा आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमध्ये ३०, आसाममध्ये ४७ जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले

पश्चिम बंगालच्या ३० व आसामच्या ४७ जागांवर शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार आक्षेप घेतला. मोदींनी आपल्या बांगलादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी आेरकांडी येथील मतुआ समुदायाच्या मंदिरात पूजा केली. या समुदायाला संबोधित केले. मोदी म्हणाले, भारतात राहणाऱ्या मतुआ समाजातील हजारो लोक या मंदिरात येऊन घेत असलेला अनुभव मी आज घेतलाय. त्यावर ममतांनी टीका केली. माेदींची ही भेट निवडणूक आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्याबाबत आयोगाकडे तक्रार करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समुदायाचे २ कोटींहून जास्त मतदार आहेत. त्यामुळेच व्होट बँकेवर नजर ठेवून भाजप व तृणमूलमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

नंदीसंग्राम : ऑडियो युद्ध सुरू, ममतांचा पाच दिवस मुक्काम
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता नंदीग्राममधून निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ हॉट सीट मानला जातोय. शनिवारी येथे ऑडियो युद्धाला सुरूवात झाली. भाजपने ममतांचा एक ऑडियो क्लिप जारी केली. त्यात ममता नंदीग्राममधील एक भाजप नेते प्रलय राय यांच्याशी फोनवरून संभाषण करत आहे. तृणमूलला विजयी करण्यासाठी ममता त्यांच्याकडे मदत मागत असल्याचा दावा या ऑडियोतून करण्यात आला. त्याला तृणमूलने देखील ऑडियो जारी करून पलटवार केला. या क्लिपमध्ये मुकूल रॉय शिशिर बाजोरियाशी संभाषण करत आहेत. निवडणूक आयोगाशी संपर्क साधून नियमांत बदलाची मागणी करायला हवी. तसे केल्यास बाहेरच्या लोकांना बूथवर एजंट करता येऊ शकेल, असे रॉय म्हणत असल्याचा दावा आहे. स्थानिकांनाच बूथ एजंट करू नये, असे भाजपला वाटते. आता नंदीग्राममध्ये ममता पाच दिवसांच्या मुक्कामी आहे. त्या प्रचार करतील. भाजपच्या ऑडिआेनंतर ममतांवरील दबाव वाढल्याचे मानले जाते. ममतांना नंदीग्राममध्ये गुंतवून ठेवण्याच्या रणनीतिवर भाजप काम करत असल्याचे सांगितले जाते. त्यातून तृणमूल कमकुवत होईल.

ओरकांडीमध्ये मुलींसाठी प्राथमिक शाळा
भारत सरकार आेरकांडीमध्ये मुलींसाठी एक प्राथमिक शाळा सुरू करेल, अशी घोषणा मोदींनी केली. येथे माध्यमिक शाळांचा दर्जाही वाढवला जाणार आहे. आेराकांडीमध्ये मतुआ समुदायाचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांचा जन्म झाला होता.

दुसरा टप्पा : गुरुवारी मतदान
बंगालमध्ये मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थांबणार आहे. गुरूवारी मतदान होणार आहे. भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पहिल्या टप्प्यासाठी आयोगाची स्तुती केली. ६ वर्षांत पहिल्यांदा सर्वात कमी हिंसाचार झाला.

मतुआ समुदायाचा बंगालच्या ७० जागांवर प्रभाव

  • बंगालच्या ७० जागांवर मतुआ समुदायाचा प्रभाव दिसून येतो. फाळणीवेळी हा समुदाय वास्तव्याला आला. उत्तर व दक्षिण २४ परगना, नादिया, जलपायगुडी, सिलीगुडी, जिल्ह्यांत हा समुदाय आहे.
  • मोदींच्या बांगलादेश दौऱ्यालाही विरोध केला जात आहे. बांगलादेशातील कट्टर इस्लामिक गट हिफाजत-ए-इस्लामचे सदस्य रस्त्यावर उतरले आहेत. धुमश्चक्रीत शनिवारपर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला.
  • बंगालमध्ये अनुसूचित जातीची एकूण लाेकसंख्या २३ टक्क्यांहून जास्त आहे. या लोकसंख्येत मतुआंचे प्रमाण २० टक्के आहे. ममतांनी या समुदायाला पहिल्यांदा राजकीय आेळख दिली.
  • मतुआ नंतर तृणमूलसाठी व्होट बँक झाली. मतुआ समुदाय २००९ पासून डाव्यांचा समर्थक मानला जात होता. नंतर समुदायाने तृणमूलला पाठिंबा दिला. लोकसभेवेळी मतुआच्या एका गटाने भाजप व दुसऱ्याने तृणमूलला पाठिंबा दिला.
बातम्या आणखी आहेत...