आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
४ राज्यांत विधानसभा निवडणुकीच्या घाेषणेनंतर भाजपने प्रचाराची माेहीम तयार केली आहे. २७ मार्च राेजी बंगाल व आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान हाेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी पश्चिम बंगालमध्ये २० व आसाममध्ये ६ जाहीर सभा घेतील. गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा बंगालमध्ये प्रत्येकी ५० सभा घेण्याच्या तयारीत आहेत.
प्रचारसभांची सुरुवात पंतप्रधान माेदी ७ मार्च राेजी ब्रिगेड मैदानातील आपल्या सभेद्वारे करतील. या सभेसाठी भाजपने १० लाखांहून जास्त लाेक एकत्र येतील, असा विश्वास वर्तवला आहे. पक्षाच्या बंगाल प्रदेश शाखेने माेदींच्या राज्यात २५-३० सभा आयाेजित करण्याची मागणी केली हाेती. माेदींनी एक महिन्यात तीन वेळा बंगालचा दाैरा केला आहे. त्याशिवाय व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे अनेक कार्यक्रमांत ते सहभागी झाले. अमित शहादेखील आसाम व बंगालमध्ये सातत्याने दाैरे करत आहेत. मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ बंगालच्या दाैऱ्यावर हाेते.पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने तुष्टीकरण आणि व्हाेट बँकेचे राजकारण केले आहे. हे राजकारण देशासाठी घातक आहे. स्थलांतरितांना बेकायदा आश्रय देणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धाेकादायक आहे, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
भारताला आपल्या आगमनाची प्रतीक्षा : मोदी
मेरीटाइम इंडिया समिट २०२१ चे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जगभरातील गुंतवणूकदारांच्या आगमनाची भारताला प्रतीक्षा आहे. भारतातील बंदरांत गुंतवणूक करावी. भारताला तुमच्या पसंतीचे व्यापारी केंद्र बनवावे, असे आवाहन याप्रसंगी माेदींनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ५० देशांतील एक लाखाहून जास्त प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. भारतीय बंदरांना गुंतवणूकदार व्यापार व वाणिज्यच्या उद्देशाने विकसित करू शकतात. सरकार देशांतर्गत जहाज बांधणी व दुरुस्ती बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठी प्राेत्साहन दिले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.