आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Modi's Attention Is On The Peacocks, But Not On The Voices Of The Unemployed In The Country; Congress Targets PM

टीकास्त्र:मोदींचे अंगणात आलेल्या मोरांवर लक्ष, मात्र देशातील बेरोजगारांच्या आवाजाकडे नाही; काँग्रेसने साधला पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यापूर्वी राहुल गांधींनी विविध मुद्द्यांवरून मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या मोराच्या व्हिडिओवरुन देखील काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींचे अंगणात आलेल्या मोरांवर लक्ष आहे. मात्र देशातील बेरोजगारांच्या आवाजाकडे लक्ष नाही, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ नुकताच पोस्ट केला होता. त्यात मोदींच्या निवासस्थानी मोर आल्याचे दिसत होते. मोदींनी निवास्थानी आलेल्या या खास पाहुण्यांची काळजी घेतली. या मोरांना ते दाणे टाकत असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. मोदींनी या व्हिडिओसोबत एक कविताही शेअर केली होती. दरम्यान, मोदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर काही युजर्सनी पसंती दर्शवली तर काहींनी नेटकऱ्यांनी कमेंट करत मोदींवर टीका केली आहे.

0