आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये भारतातील पहिला ‘बुद्धिमान रस्ता’ ४० लाख रुपये खर्चातून तयार होत आहे. मोहाली विमानतळाकडे जाणाऱ्या या १० किमी रस्त्याला आयआयटी रुरकी विशेष सेन्सरयुक्त करणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रकारचा तांत्रिक अभ्यास झाला आहे. पंजाबच्या वाहतूक सल्लागार कार्यालयाने या प्रकल्पाला डेव्हलपमेंट ऑफ इंटेलिजंट मोबिलिटी अँड इफिशियंट ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम नाव दिले आहे. यात केवळ रस्ता अपघात टाळण्याची व्यवस्था नसेल तर पेट्रोल बचतही होईल. रस्त्यावर चालणाऱ्या रुग्णवाहिकेचे वाचन करून स्पेशल सेन्सर तिला वेगळी जागा देईल. एवढेच नव्हे तर एखादे वाहन वळत असेल किंवा मागे येत असेल तर सेन्सर आवाज करून अन्य वाहनांना सतर्क करेल. रस्त्यावर काही होत असेल तर त्यासमोर येणाऱ्या वाहनांना लांबूनच अलर्ट मिळेल.
पंजाब पोलिस, आयआयटी रुरकी आणि पंजाबमध्ये कार्यरत सेफ सोसायटीत एक सामंजस्य करार झाला आहे. हा प्रकल्प पंजाब रस्ते सुरक्षा अथवा ट्रॅफिक रिसर्च सेंटर मोहालीच्या देखरेखीखाली लागू केला जाईल.
तीन पद्धतींनी सेन्सर ओळखेल
व्हेईकल टू ह्यूमन
सेंसरयुक्त रस्त्यावर एखादा व्यक्ती व गर्दी रस्ता ओलांडून करत असेल तर सेन्सर प्रथम माणसाला डिटेक्ट करेल व वाहनांना थांबण्याचा संदेश देईल. यामुळे रस्ता अपघात होणार नाही.
व्हेईकल टू इन्फ्रास्ट्रक्चर
सिग्नलवर रुग्णवाहिका, सिटी बस, फायर ब्रिगेड आणि पोलिसांच्या गाड्या उभ्या असल्यास १० किमीत जेवढ्या ट्रॅफिक लाइट्स आहेत, सर्वांना संकेत पोहोचेल आणि पूर्ण रस्त्यावर वाहनांना हिरवा सिग्नल मिळेल. रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडला आधी रस्ता मिळेल. इतरांना स्पीडनुसार मिळेल.
वाहन ते वाहन
ट्रॅफिक लाइट्स रेड झाल्यास चालकाने कार मागे घेतल्यास रस्त्यावर सेन्सर बीप करेल. यामुळे उर्वरित चालकही गाड्या मागे घेतील. यामुळे सिग्नल जवळच्या गाड्या मागे जातील.
युरोपीय तंत्रज्ञानापेक्षा १० पट चांगले
आपले सेन्सर तंत्रज्ञान अमेरिका, चीन आणि युरोप निर्मित तंत्रज्ञानापेक्षा १० पट चांगले आहे. वेग पकडणे आणि लाल दिवा मोडणाऱ्या गाड्यांवरही ऑटो कॅमेऱ्यांची नजर राहील. देशात विकसित झालेल्या या सेन्सर्सचा पहिल्यांदाच देशात तयार झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
सेन्सरयुक्त रस्त्यात विनाअडथळा रुग्णवाहिका धावेल, गर्दीत अडकल्यावर सहज ओळखू शकेल
पंजाबचे वाहतूक सल्लागार नवदीप असिजा म्हणाले, विमानतळ रस्त्यावर सर्वाधिक अपघात होतात. ५ अॅक्सिडेंटल ब्लॅक स्पॉट आहेत. इंटेलिजंट रोडच्या माध्यमातून ट्रॅफिक लाइट्स वाहतुकीच्या हिशेबाने चालतील आणि सिटी बस सेवा व रुग्णवाहिकेस प्राधान्य मिळेल. गर्दीत रुग्णवाहिका अडकल्यास त्वरित सेन्सर ओळखेल आणि १० किमीपर्यंत रुग्णवाहिकेस वाहतूक सिग्नल हिरवा दाखवेल. तसेच काम अग्निशमन वाहन आणि पोलिस गाड्यांसाठी करेल.
इंधन बचत, अपघात नाही
- वातावरणाच्या हिशेबाने हे तंत्रज्ञान लाभदायक, यामुळे इंधनाची बचत होईल.
- वाहनांची गती हळू होईल आणि अपघातही होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.