आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात 70% साक्षरता होती:सरसंघचालक मोहन भागवत इंग्रजांवर भडकले; म्हणाले - ब्रिटीशांनी भारतीय मॉडेल पळवले

कर्नाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतातील 70 टक्के जनता साक्षर असल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. भारतात ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी 70 टक्के लोकसंख्या सुशिक्षित होती. त्यावेळी देशात कोणतीही बेरोजगारी नव्हती. त्याच शिक्षणाच्या आधारावर सर्वचजण आपल्या उपजिविकेचे साधण शोधत होते, असे ते म्हणालेत.

हरियाणाच्या कर्नाळमध्ये बोलताना RSS प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या देशाचे शिक्षण मॉडल कचरापेटीत टाकले. म्हणजे त्यांनी शिक्षणाचे आपले मॉडेल आपल्या देशात नेले आणि त्यांच्या देशाचे मॉडेल भारतात लागू केले.

भारताचे शिक्षण मॉडेल इंग्लंडमध्ये लागू झाल्यानंतर तेथील 70 टक्के जनता सुशिक्षित झाली. याऊलट त्यांचे शैक्षणिक मॉडेल आपल्याकडे लागू झाल्यामुळे भारतातील केवळ 17 टक्के जनताच शिक्षित उरली.

सर्वांसाठी स्वस्त व सुलभ होते आपले शिक्षण

मोहन भागवत म्हणाले की, भारताची शिक्षण व्यवस्था केवळ रोजगारासाठीच नव्हे तर ज्ञानाचेही माध्यम होती. शिक्षण माफक व सर्वांसाठी सुलभ होते. त्यामुळे शिक्षणाचा संपूर्ण खर्च समाजाने उचलला. या शिक्षण पद्धतीतूनच पुढे आलेल्या विद्वानांनी, कलाकारांनी व कारागिरांनी संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली.

मोहन भागवत यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती.
मोहन भागवत यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती.

मोहन भागवत म्हणाले - हे ऐतिहासिक सत्य आहे

भागवत आपल्या संबोधनात म्हणाले की, हे ऐतिहासिक सत्य आहे. आपल्याकडे शिक्षक सर्वांना शिकवत होते. त्यात जातीपातीचा भेदभाव केला जात नव्हता. व्यक्तीला आपले जीवन स्वबळावर जगता यावे, असे शिक्षण त्यांना मिळत होते. शिक्षक गावोगावी जाऊन शिकवत होते. ते आपल्या पोटापाण्यासाठी असे करत नव्हते. तर शिक्षण देणे आपले कर्तव्य असल्याचे समजून ते हे काम करत होते. शिकवणे त्यांचा धर्म होता. त्यामुळे त्याच्या उपजिविकेची जबाबदारी संपूर्ण गाव उचलत होते. अशा प्रकारचे भारताचे जुने शिक्षण मॉडेल होते, असे सरसंघचालक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...