आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्मग्रंथांचे पुनरावलोकन गरजेचे:सरसंघचालक म्हणाले - काही स्वार्थी लोकांनी धर्मग्रंथात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे

नागपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मग्रंथांची पुन्हा समीक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'आपल्याकडे पूर्वी ग्रंथ नव्हते. आपला धर्म मौखिक परंपरेतून चालत आला. पुढे धर्मग्रंथांची सरमिसळ झाली आणि काही स्वार्थी लोकांनी त्यात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे. त्यामुळे त्या ग्रंथ व परंपरांच्या ज्ञानाची पुन्हा एकदा समीक्षा करणे आवश्यक आहे.'

नागपूरच्या कान्होलीबारामध्ये आर्यभट्ट अॅस्ट्रोनॉमी पार्कच्या उद्घाटनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे.

आपल्याकडे जगभरातील समस्यांवर तोडगा

भागवत म्हणाले - "आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्या आधारावर आपली वाटचाल सुरू होती. पण परदेशी आक्रमणामुळे आपली व्यवस्था नष्ट झाली. आपल्या ज्ञानाची परंपरा खंडीत झाली. आपण खूप अस्थिर झालो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या परंपरेत काय आहे याचे किमान काही मूलभूत ज्ञान असले पाहिजे, जे शिक्षण व्यवस्थेद्वारे तसेच लोकांमधील सामान्य संवादाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते.'

सरसंघचालक असेही म्हणाले की, 'भारतीयांनी त्यांच्या पारंपारिक ज्ञानाचा आधार शोधला व विद्यमान स्थितीसाठी काय स्वीकार्य आहे हे शोधून काढले, तर "जगातील अनेक समस्या आपल्या उपायांनी सोडवता येतील".

नव्या अभ्यासक्रमात अनेक नव्या गोष्टींचा समावेश

मोहन भागवत म्हणाले की, 'भारताच्या पारंपारिक ज्ञानाचा आधार खूप मोठा आहे. आपली काही प्राचीन पुस्तके गहाळ झाली आहेत. काही प्रकरणांत स्वार्थी लोकांनी त्यात चुकीचा दृष्टीकोन मांडला आहे. पण आता नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात पूर्वी अस्तित्वात नसणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.'

RSS शी संबंधित खालील बातम्या वाचा...

हेडगेवार मुस्लिमांना ‘यवन सर्प’ म्हणत:भागवत म्हणाले, इस्लामला धोका नाही; संघाने भूमिका बदलली का?

RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी 11 जानेवारी 2023 रोजी 'ऑर्गनायझर' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.यापूर्वी 2 जून 2022 रोजी भागवत म्हणाले होते की, रोज मशिदीत शिवलिंग का पाहायचे आहे? 6 सप्टेंबर 2021 रोजी म्हणाले होते की, हिंदू आणि मुस्लिम एकाच वंशातील आहेत. 4 जुलै 2021 रोजी म्हणाले होते की, जो हिंदू म्हणतो की मुस्लिम येथे राहू शकत नाही, तर तो हिंदू नाही. मोहन भागवतांच्या या विधानांमुळे आरएसएसचा मुस्लिमांबाबतचा दृष्टिकोन मवाळ झाल्याची चर्चा सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

RSSने केले LGBTचे समर्थन:सरसंघचालक भागवत म्हणाले - त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करा, मुस्लिमांनी 'हम बडे'ची भावना सोडावी

हिंदू हीच आपली ओळख, राष्ट्रीयत्व व सर्वांना आपले मानण्याची व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती आहे. देशात इस्लामला कोणताही धोका नाही. पण त्यांना आम्हीच मोठे ही भावना सोडावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...