आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत पुढील 20 ते 30 वर्षांत विश्वगुरू होईल. जगातील कुणीही तर्काच्या आधारावर आपल्याशी युक्तिवाद करू शकत नाही. त्यामुळे भारताच्या विकासाची गती संथ करण्यासाठी त्याच्याविषयी चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे बोलताना केले.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याविषयी अपप्रचार -भागवत
भागवत म्हणाले - भारताने गत काही वर्षांत खूप काही साध्य केले. पण जगात आपल्याविषयी पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी भावी पीढ्यांना तयार करण्याची गरज आहे. हे जगाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गरजेचे आहे. स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणजे 1857 च्या उठावाविषयीही काही चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. पण स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला हीन-दीन समजणाऱ्यांसाठी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी 2-3 पीढ्या तयार करण्याची गरज
मोहन भागवत म्हणाले - हिंदू राष्ट्रात विश्वास नसणाऱ्या लोकांनाही भारताने वेगवान प्रगती साधावी असे वाटते. 1857 च्या क्रांतीनंतर संपूर्ण भारत एकजूट होण्यास सुरुवात झाली. समाजात जनजागृती झाली. त्यानंतर काही काळाने आपण योग्य ते प्रत्युत्तर देण्यास तयार झालो. तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सुरुवात केली होती. जगातील जे लोक आपल्याला गुलाम बनवण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांना आपली भूमिका बदलण्यास मजबूर व्हावे लागले. पण संघर्ष आजही सुरूच आहे. आता आपल्याला नवी पीढी तयार करण्याची गरज आहे. तेव्हाच पुढील 20-30 वर्षांत भारत विश्वगुरू होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.