आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी भारताच्या विकास मॉडलवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारताने चीन व अमेरिकेची नक्कल करू नये. त्याने स्वतःच्या मार्गावर चालावे. यासाठी भारताला स्वतःचे मॉडल स्वीकारण्याची गरज आहे. भागवत मुंबईत भारत विकास परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भारताला विश्वगुरु बनवण्याच्या दिशेने काम करण्याची गरजही व्यक्त केली.
सरसंघचालक म्हणाले - भारताचा दृष्टिकोन लोकांची परिस्थिती, संस्कार, संस्कृती, जगाच्या आधारावर विचार करण्याचा असला पाहिजे. जगात काही चांगले आले तर त्याचा स्वीकार करू. पण निसर्ग व आपल्या अटींवर त्याचा स्वीकार केला जाईल.
देशाचा आत्मा एकच -भागवत
भागवत म्हणाले - भारत विविध भाषा, संस्कृती, व्याकरण, कला व सभ्यतांनी निर्माण झाला आहे. पण जवळून पाहिल्यास या देशाचा आत्मा एकच आहे. हा भारताचा अविभाज्य आत्मा आहे.
ते म्हणाले, "मी आज एक संदेश देतो की, विश्वास व प्रेमात समानता आहे. कारण, या दोन्ही गोष्टी बळजबरीने साध्य करता येत नाहीत. काशी तमिळ संगमम् ने दोन्ही क्षेत्रांमध्ये विश्वास व प्रेमाचे एक नवे वातावरण तयार केले आहे. भागवत पुढे म्हणाले की, भारताला जगाकडून शिकण्याची गरज असेल तर देश अवश्य शिकेल. पण आपल्या मूळ सिद्धांत व विचारांवर कायम रहावे लागेल.
राष्ट्र प्रथमचा पुनरुच्चार
मोहन भागवत यांनी यावेळी राष्ट्र प्रथमचा पुनरुच्चार करत भारत विविधतेत एकतेची भूमी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले - आपल्या राज्यघटनेने आपल्याला सामाजिक सुरक्षा दिली आहे. त्यामुळे देशाने जे काही दिले आहे ते आपल्याला फेडावे लागेल. भारत जग जिंकण्यासाठी नव्हे तर जनतेला एकजूट करण्यासाठी आहे. आपली वैशिष्ट्य व गुण जगात संतुलन राखतील.
काठ्या चालवणाऱ्याच्या काठ्या मोडीत निघतील
मोहन भागवत म्हणाले की, भारत विकसित झाला तर जगही विकसित होईल. यामुळे जगात युद्ध होणार नाही. आपण बलशाही झालो तर चीन, अमेरिका व रशियासारख्या काठ्या चालणार नाहीत. आपल्यालामुळे काठ्या चालवणाऱ्यांच्याही काठ्या मोडीत निघतील. पण हे सर्व काही करायचे असेल तर सर्वांना मिळून काम करावे लागेल.
जगाला आज भारताची गरज
तत्पूर्वी, गुरुवारी सरसंघचालकांनी भारताला मिळालेल्या जी-20 च्या अध्यक्षत्वाचे कौतुक केले होते. भागवत म्हणाले होते - जी20 चे नेतृत्व भारताला मिळण्यात काहीही नाविण्य नाही. जगाला आता भारताची गरज आहे. जगात आता केवळ भारताची चर्चा होते. भारत जगाचे नेतृत्व करू शकतो हे आता जगाला समजले आहे.
G20 च्या नेतृत्वामुळे जनतेचे मनोबल वाढले
मोहन भागवत म्हणाले की, जगाला एकजूट करण्यासाठी खूप दूर जावे लागेल. G20 नेतृत्वाने देशाचे मनोबल वाढवले आहे. आता भारत जगात मागे नाही तर विश्वगुरु बनण्याच्या दिशेने अग्रेसर झाला आहे असे जगाला वाटते. भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळणे ही केवळ सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. संपूर्ण समाजाला भारताला विश्वगुरु करण्याच्या दिशेने काम करावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.