आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS प्रमुखांचा सल्ला:हिंदूंनी लग्नासाठी धर्म बदलू नये, असे करून ते चूक करत आहेत; सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगण्याचे संस्कार द्यावे लागतील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, जे हिंदू लग्न करण्यासाठी धर्म बदलत आहेत, त्यांची मोठी चूक होत आहे. ते म्हणाले की हे सर्व छोट्या वैयक्तिक स्वार्थासाठी होत आहे. हिंदू कुटुंबे आपल्या मुलांना त्यांच्या धर्माचा आणि परंपरांचा अभिमान बाळगण्यास शिकवत नाहीत.

मोहन भागवत उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे RSS कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित करत होते. ते म्हणाले- 'धर्मांतर कसे होते? आपल्या देशातील मुले आणि मुली इतर धर्मांमध्ये कसे जातात? छोट्या-छोट्या स्वार्थामुळे . लग्न करण्यासाठी जातात. धर्मांतर करुन घेणारे चुकीचे आहेत, ही एक वेगळी गोष्ट आहे, पण आपली मुले आपण तयार करत नाहीत का?

आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगण्याचे संस्कार द्यावे लागतील
ते म्हणाले की, 'आपल्याला त्याचे संस्कार घरीच द्यावे लागतील. स्वतःसाठी अभिमान, आपल्या धर्मासाठी अभिमान. आपल्या पुजेचा आदर. जर त्याच्यासाठी प्रश्न असतील तर त्याचे उत्तर द्या. गोंधळून जाऊ नका. '

भागवत यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अनेक भाजप शासित राज्ये लग्नासाठी कथित लव्ह-जिहाद किंवा धर्मांतराच्या विरोधात कायदे घेऊन आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे हे कायदे लागू केले गेले असे मानले जाते.

50% महिलांनी आयोजनांमध्ये सामिल व्हावे
यावेळी भागवत यांनी भारतीय कौटुंबिक मूल्ये आणि त्यांचे जतन कसे करावे याबद्दल तपशीलवार सांगितले. आरएसएसच्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच कसे दिसतात हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, आरएसएसचा उद्देश हिंदू समाजाला एकत्र करणे आहे, परंतु जेव्हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा आपल्याला फक्त पुरुषच दिसतात. जर आपल्याला संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर किमान 50% महिलांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागेल. भागवत म्हणाले की, भारतीयांनी नेहमीच आपली संपत्ती इतरांसोबत वाटून घेतली आहे. मुघलांच्या आगमनापूर्वी भारतात भरपूर संपत्ती होती.

बातम्या आणखी आहेत...