आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू हीच आपली ओळख, राष्ट्रीयत्व व सर्वांना आपले मानण्याची व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती आहे. देशात इस्लामला कोणताही धोका नाही. पण त्यांना आम्हीच मोठे ही भावना सोडावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांनी केले आहे.
'ऑर्गनायझर' व 'पांचजन्य'ला दिलेल्या मुलाखतीत भागवत यांनी एलजीबीटी समुदायाचेही जोरदार समर्थन केले. ते म्हणाले - त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान झाला पाहिजे. संघ या विचारधारेला प्रोत्साहन देण्याचे काम करेल. मानव अस्तित्वात आला तेव्हापासूनच असा कल असणारे लोक आहेत. ही जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे त्यांनाही त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. आपणही या समाजाचा घटक आहोत, असे त्यांना वाटले पाहिजे. ही एक सामान्य गोष्ट आहे.
ट्रान्सजेंडर म्हणजे समस्या नाही
सरसंघचालक म्हणाले - ''तृतीय पंथी व्यक्ती (ट्रान्सजेंडर) समस्या नाहीत. त्यांचा स्वतःचा पंथ आहे. त्यांचे स्वतःचे देव-देवता आहेत. आता तर त्यांचे महामंडलेश्वरही आहेत. संघाचा या प्रकरणी कोणताही वेगळा दृष्टिकोन नाही. हिंदू परंपरेनेही या गोष्टींवर विचार केला आहे.''
भागवत म्हणाले - ''हिंदी आपली ओळख, राष्ट्रीयत्व व सर्वांना आपले मानण्याची व सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती आहे.'' ते म्हणाले - ''हिंदुस्तान, हिंदुस्तान रहावा. स्पष्ट गोष्ट आहे. यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणतेही नुकसान होणार नाही. रहायचे असेल तर बिनधास्त रहा. आपल्या पूर्वजांकडे यायचे असेल तर या. सर्वकाही त्यांच्या मनावर आहे.''
इस्लामला धोका नाही
''भारतात इस्लामला कोणताही धोका नाही. पण आम्हीच मोठे आहोत. आमचे पूर्वज राजेमहाराजे होते. आम्ही पुन्हा राजा होझऊ...ही भावना त्यांना सोडावी लागेल. असा विचार करणारा एखादा हिंदू व्यक्ती असेल तर त्यालाही हे सोडावे लागेल. कम्युनिस्ट असेल, तर त्यालाही ही गोष्ट सोडावी लागेल,'' असे भागवत म्हणाले.
हिंदूंच्या उत्थानात सर्वांचे उत्थान
लोकसंख्या धोरणाविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक भागवत म्हणाले - ''सर्वप्रथम हिंदूंनी आपण बहुसंख्य आहोत व आपल्या उत्थानानेच या देशातील सर्वजण सुखी होतील हे समजून घेतले पाहिजे. लोकसंख्या एक ओझेही आहे व उपयोगी गोष्टही आहे. या प्रकरणी एक दूरगामी व सखोल विचाराअंती एक धोरण बनले पाहिजे. हे धोरण सर्वांवर समानपणे लागू झाले पाहिजे. यासाठी कोणतीही जबरदस्ती होता कामा नये. यासाठी समाजाला शिक्षित करावे लागेल.''
सरसंघचालक पुढे बोलताना म्हणाले की, ''लोकसंख्या असमतोल अव्यवहार्य गोष्ट आहे. कारण, जिथे असंतुलन झाले तिथे देश कोसळला. जगात सर्वत्र असे घडले. हिंदू आक्रमक नसलेला एकमेव समाज आहे. त्यामुळे अनाक्रमकता, अहिंसा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या गोष्टी जतन करण्याची गरज आहे. भारत पूर्वी अखंड होता. पण इस्लामी आक्रमण व इंग्रजांमुळे या देशाची फाळणी झाली. आपल्याला खूप काही भोगावे लागले. हे सर्वकाही आपण हिंदू भावना विसरल्यामुळे घडले.''
हिंदू आता जागृत झाला
भागवत म्हणाले -''आमच्या राजकीय स्वातंत्र्याला बाधा आणण्याची ताकद आता कुणातच नाही. हिंदू या देशात राहील. तो कुठेही जाणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. हिंदू आता जागृत झाला आहे. याचा वापर करून आपल्याला आतली लढाई जिंकायची आहे आणि आपल्याकडे असलेला तोडगा मांडायचा आहे.''
सरसंघचालक म्हणाले - ''नवनवीन तंत्रज्ञान येत राहील. पण तंत्रज्ञान हे माणसांसाठी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल लोकांना भीती वाटू लागली आहे. ते अनिर्बंध राहिले, तर उद्या यंत्राचे राज्य अस्तित्वात येईल.''
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.