आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mohan Bhagwat To Meet Top RSS Functionaries In Delhi Tomorrow​​​​​​​; News And Live Updates

संघाला भाजपची चिंता:दिल्लीत मोहन भागवतांसह आरएसएसच्या 10 मोठ्या नेत्यांची बैठक; कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यांसारख्या अनेक मुद्यावरून मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हता देखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भाजपची विश्वासार्हता कशी वाढवता येईल यावर भर दिला जाणार आहे.

ही बैठक शनिवारी दिल्लीत होणार असून यामध्ये संघातील 10 मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रेय होसाबाळे, कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी आणि भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहे. हे सर्व नेते सध्या दिल्लीत पोहचले असून ते उद्याच्या बैठकीत संदर्भांत विचारमंथन करीत आहे.

या चार प्रमुख मुद्यांवर होत आहे विचारमंथन

1. बंगाल निवडणुकीतील पराभव, राज्यात हिंदूवर होणारे अत्याचार आणि बंगालमध्ये सुरु असलेल्या विचार युद्धांची दिशा काय असेल?

2. उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेली राजकीय गतिरोध कमी करणे. पंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?

3. कोरोनाकाळात मोदी सरकारची विश्वासार्हता का कमी झाली? सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले का? केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केल्याने पक्षाला काय फायदा होईल?

4. केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा, कित्येक राज्यांत भाजप नेत्यांना गावात प्रवेश दिला जात नाही.

बातम्या आणखी आहेत...