आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशाचे बडे भाजप नेते तथा उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी माता सीतेचे आयुष्य एखाद्या घटस्फोटीत महिलेसारखे असल्याचे वादग्रस्त विदान केले आहे. ते रविवारी उज्जैनच्या नागदात कारसेवक सन्मान समारंभात बोलत होते. ते म्हणाले - श्रीरामांना मर्यादेमुळे सीतेचा त्याग करावा लागला. त्यांनी जंगलात मुलांना जन्म दिला. अनेक कष्ट सहन करूनही त्यांनी श्रीरामांच्या हित चिंतले. आजच्या काळात हे आयुष्य घटस्फोटीत महिलेसारखे आहे.
वाचा शिक्षण मंत्री नेमके काय म्हणाले...
मंत्री मोहन यादव म्हणाले, ज्या सीता मातेला श्रीरामांनी एवढे मोठे युद्ध करून आणले, त्यांना गरोदर असतानाही राज्याच्या मर्यादेमुळे सोडावे लागले. त्या सीतेच्या मुलांना जंगलात जन्म घ्यावा लागला. या मातेची एवढे कष्ट सहन करूनही आपल्या पतीवरील श्रद्धा की झाली नाही. कष्ट विसरून त्या भगवान रामाच्या जीवनाची मंगल कामना करत राहिल्या. श्रीरामांचे गुण सांगण्यासाठी त्यांनी मुलांनाही संस्कार दिले. सामान्यतः हे आजच्या काळात घडले असते, तर हे घटस्फोटानंतरचे जीवन मानले गेले असते. एखाद्याला अशा प्रकारे घराबाहेर काढण्याला दुसरे काय म्हणावे. अशा कष्टांनंतरही संस्कार किती चांगले की, लव-कुशने श्रीरामांना पुन्हा रामायणाची आठवण करून दिली.
शरीर सोडण्याला आत्महत्या म्हणतात
चांगल्या भाषेत सांगायचे तर पृथ्वी दुभंगली व त्यात माता सामावली. सरळ व सरकारी भाषेत सांगायचे, तर त्यांच्या पत्नीने त्यांच्यापुढे शरीर सोडले. शरीर सोडण्याला आत्महत्या मानले जाते. पण एवढ्या कष्टानंतरही भगवान श्रीरामांनी जीवन कसे काढले असेल. ते सीतेशिवाय एक क्षणही जगण्याचा विचार करू शकत नव्हते. त्यानंतरही त्यांनी रामराज्यासाठी आपले जीवन दिले. पुढे सरकलो तर त्यांच्यापुढे भगवान लक्ष्मण यांनीही आपले प्राण त्यागले. त्यानंतरही रामराज्य अखंड चालत राहिले.
कारसेवकांच्या सन्मान सोहळ्यात गेले होते मंत्री
मोहन यादव नागदा-खाचरौद क्षेत्रातील कारसेवकांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी वंदे मातरम ग्रुपच्यावतीने 94 कारसेवकांचा सन्मान केला. त्यातील अनेकजण सध्या या जगात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यातर्फे सत्कार सोहळा स्वीकारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.