आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड गायक मोहित चौहानच्या इव्हेंटवरून वाद:स्थानिकांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार; रायपूर AIIMS मध्ये मिडनाईट केला फरफॉर्म

रायपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) मधील कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रात्री 1 वाजेपर्यंत मोठ्या आवाजात डीजे लावून त्रास दिला गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत आयोजकांविरूद्ध कारवाई केली जावी, अशी तक्रार नागरिकांनी केंद्रीय मंत्र्याकंडे केली आहे.

या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना आपली जबाबदारी समजली नाही का ? पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला कार्यक्रम का थांबवला नाही. या गोंगाटामुळे हॉस्पिटलच्या परिसरात राहणारे लोक त्रस्त झाले. या तीन दिवसीय कार्यक्रमात बॉलिवूडमधील गायक मोहित चौहान याने देखील फरफॉर्म केला आहे. रात्री उशीरा कार्यक्रमामुळे ध्वनी प्रदूषण झाले असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, रात्री उशीरा पर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमाचे व्हिंडिओ देखील स्थानिकांनी सोशल मीडियावर टाकले असून ते आता चांगलेच व्हायरल झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून आयोजकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केंद्रीय मंत्र्याकंडे नागरिकांनी केली आहे.

गायक मोहीत चौहान यांच्या कार्यक्रमामुळे ध्वन प्रदूषण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गायक मोहीत चौहान यांच्या कार्यक्रमामुळे ध्वन प्रदूषण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वास्तविक ओरियाना-2022 नावाचा कार्यक्रम AIIMS मध्ये आयोजित करण्यात आला होता. येथील महाविद्यालयात दरवर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम ज्युनियर डॉक्टरांकडून आयोजित केला जातो. कार्यक्रमाचा भाग म्हणून दिवसभर अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. यानंतर फॅशन शो, कॉमेडी, सिंगिंग नाईट आणि संध्याकाळी रॉक बँड परफॉर्मन्स झाला. आता वाद असा आहे की, कार्यक्रमात नियमांची पायमल्ली करून रात्री उशिरापर्यंत मोठ्याने गाण्यांचा आवाज केला जातो. एम्स लगत राहणाऱ्या स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पण त्यांना मदत मिळाली नाही.

स्थानिकांनी केंद्रीय मंत्र्यांना याबाबत पत्र पाठवून तक्रार केली आहे.
स्थानिकांनी केंद्रीय मंत्र्यांना याबाबत पत्र पाठवून तक्रार केली आहे.

आता केंद्रीय मंत्र्याकडे तक्रार करा
या संपूर्ण प्रकरणात छत्तीसगड नागरी संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ओरियाना कार्यक्रमात दुपारी एक वाजेपर्यंत सायलेंट झोन एम्स रुग्णालयाजवळ ध्वनी प्रदूषण होत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अशा कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शर्ली सेठिया या अभिनेत्रीने देखील या इव्हेंटमध्ये फरफॉर्म केला होता.
शर्ली सेठिया या अभिनेत्रीने देखील या इव्हेंटमध्ये फरफॉर्म केला होता.

नागरी संघर्ष समितीचे सदस्य विश्वजीत मित्रा म्हणाले की, एम्स हे ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2000 अंतर्गत येते. जिथे रात्री 10 नंतर आवाजाची पातळी 40 डेसिबलपेक्षा जास्त नसावी. 500 मीटर अंतरावरून घेतलेल्या व्हिडिओवरून हे सिद्ध होते की, या ठिकाणी आवाजाची पातळी 120 डेसिबलपेक्षा जास्त झालेली होती.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

केंद्रीय मंत्र्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, AIIMS व्यवस्थापनाचे काम मनोरंजन करणे नाही, तेही जनतेच्या पैशातून. हे असे कृत्य आहे ज्यासाठी निलंबन ही योग्य शिक्षा नाही. एम्स रायपूरमध्ये रुग्ण बरे होत असताना सलग तीन दिवस सायलेंट झोनमध्ये अशाप्रकारचे वर्तन करणे चुकीचे आहे. ध्वनी प्रदूषणामुळे आजूबाजूचे रहिवासी, वृद्ध व लहान मुले त्रस्त आहेत. या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 15 आणि IPC च्या विविध कलमांखाली इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी करण्यात आली.

AIIMS हॉस्पिटलचा परिसर
AIIMS हॉस्पिटलचा परिसर

आयोजकाने धन्यवाद म्हणत फोन कट केला, एम्सच्या विकास चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दिव्य मराठीचे प्रतिनिधी सुमन पांडे यांनी याबाबत आयोजकांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क केला.

त्याच्यातील संभाषणात काय म्हटले वाचा-

रिपोर्टर - रायपूर AIIMS मध्ये तुम्ही ओरियाना कार्यक्रम आयोजित केला होता का?

विकास - होय, आम्ही केला होता.

रिपोर्टर - तुमच्या कार्यक्रमाची परवानगी किती वाजेपर्यंत होती?

विकास - ही सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही.

रिपोर्टर - तुमची परवानगी होती का?

विकास - होय, त्यानुसार कार्यक्रम झाला.

रिपोर्टर - नागरिक संघर्ष समितीने केंद्रीय मंत्र्यांकडे ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली असून, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाच्या गोंगाटामुळे नागरिक त्रस्त झाले होते. यावर तुमचे काय मत आहे ?

विकास - धन्यवाद आणि फोन ठेवून दिला.

कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी, यावेळी आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जात होता.
कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी, यावेळी आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जात होता.

हजारो लोकांची गर्दी होती
एम्सच्या ओरियाना कार्यक्रमात दोन हजारांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती. मोठ्या परिसरात हाय लेव्हल साउंड सिस्टीम बसवण्यात आली होती. अगदी मोठमोठ्या मैफिलींप्रमाणे. दरम्यान, गायक मोहित चौहान यांनी 'सड्डा हक नादान परिंदे' सारखी त्यांची प्रसिद्ध गाणी गायली, हा अनुभव कार्यक्रमात उपस्थितांसाठी मधुर होता. मात्र रुग्णालय आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी रात्री उशिरापर्यंत आवाज सहन केला. आता कारवाईची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...