आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून उद्या मोचा चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, व्यक्त करण्यात आली आहे.
मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 8 ते 12 मे दरम्यान किनारपट्टीवर ताशी 70 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. 8 ते 12 मेपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
चक्रीवादळ शक्तीशाली
IMD ने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रीवादळ शक्तीशाली असणार आहे. या वादळाचा तडाखा छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात देण्यात आला असून भारताच्या पूर्व किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर कितपत परिणाम?
महाराष्ट्रात या चक्रिवादळाचा थेट परिणाम होणार नसला तरीही ढगाळ वातावरण आणि अवकाळीचे सावट मात्र कायम राहणार आहे. शिवाय वादळ जसजसे पुढे सरकेल तसतसे देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागावर याचे परिणाम दिसू लागणार आहेत. दरम्यान आज (ता. ९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
मोचा चक्रीवादळ नाव कोणी दिले?
जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अॅँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिकच्या सदस्य देशांनी स्वीकारलेल्या नामकरण प्रणाली अंतर्गत हे नाव ठेवण्यात आले आहे. येमेन या देशाने या चक्रीवादळाचे नाव मोचा असे सुचवले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.