आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Money Laundering By Loan App, 2 Lakh Crores Of Indians To China Via Cryptocurrency | Marathi News

चीनचा आणखी एक:लोन अॅपने मनी लाँड्रिंग, भारतीयांचे 2 लाख कोटी क्रिप्टोकरन्सीद्वारे चीनमध्ये

जयपूर / अवधेश आकोदिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात मोबाइल अॅपने त्वरित कर्ज देण्याच्या नावावर मनी लाँड्रिंगचे चिनी रॅकेट सक्रिय आहे. १ हजारपेक्षा जास्त अॅपद्वारे एकत्र केलेल्या रकमेतून २ लाख कोटी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे चीनमध्ये पोहोचले आहेत. देशात मनी लाँड्रिंगचे हे बहुधा सर्वात मोठे प्रकरण आहे. तपास संस्थांनुसार, हा प्राथमिक आकडा आहे. खरी रक्कम अनेक पट असण्याची शक्यता आहे. सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसच्या (एसएफआईओ) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या अॅप कंपन्या भारतीयांच्या नावाने नोंदणीकृत आहेत. रक्कम पकडली जाऊ नये यासाठी चीनला पाठवण्याआधी ती शेल कंपन्यांच्या मोठ्या नेटवर्कमध्ये फिरवली जात आहे. लोन अॅप खासगी डेटात घुसून ब्लॅकमेलिंगद्वारे वसुली करत आहेत, अशी तक्रार तेलंगण, यूपी, गुजरात, दिल्ली, पंजाब आणि ओडिशाच्या सरकारने केली होती. त्यानंतर तपास सुरू झाला. रिझर्व्ह बँक लोन अॅपचा परवाना भारतीय कंपनीलाच देते, त्यामुळे चिनी कनेक्शन असलेल्या कंपन्या दिल्ली, गुरुग्राम आणि हैदराबादमध्ये नोंदलेल्या आहेत. अॅपने कर्ज घेताच मोबाइलमध्ये सेव्ह फोटो-व्हिडिओ लीक होतात. नंतर वसुलीचे कॉल येतात.

खासगी फोटो-व्हिडिओ परिचितांना पाठवण्याची धमकी दिली जाते. नंतर अनेक पट वसुलीचा फेरा सुरू होतो. तपास संस्थांपासून वाचण्यासाठी १०० पेक्षा जास्त शेल कंपन्यांत देणेघेणे होते. अखेर क्रिप्टोकरन्सीद्वारे चिनी कंपनीला रक्कम ट्रान्सफर होते. एकाच पत्त्यावर अनेक शेल कंपन्या उघडल्या आहेत, असे तपासात आढळले. त्यांचे संचालक मध्यम आणि निम्न मध्यम वर्गातील तरुण आहेत, त्यांना दरमहा २५ ते ३० हजार रुपये मिळतात.केंद्रीय तपास संस्थांनी चीनच्या या खेळात ३०० अॅप सहभागी असल्याला दुजोरा दिला आहे. त्याचे डाउनलोड काउंट ५० हजार ते १० लाखादरम्यान आहे. एसएफआयओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, किमान १० कोटी मोबाइलमध्ये हे अॅप इन्स्टॉल आहेत.

बातम्या आणखी आहेत...