आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग:जामिनावर सुनावणीपूर्वी मनीष सिसोदियांना ईडीने केली अटक

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील अबकारी धोरणातील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून गुरुवारी ईडीने आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. राउज अॅव्हेन्यू कोर्टात शुक्रवारी त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती. परंतु त्याच्या एक दिवस आधीच ईडीने त्यांना अटक केली. ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने आरोप केला की, सिसोदिया जबाब देण्यात टाळाटाळ करत होते. चौकशीतही सहकार्य करत नव्हते. २०२१-२२ साठी अबकारी धोरण (आता रद्द) तयार करणे आणि लागू करण्यात झालेल्या कथित भ्रष्टचार प्रकरणात २६ फेब्रुवारीला सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, सिसोदियांनी कोठडीतून पत्र लिहिले आहे. शिक्षण, राजकारण आणि जेल या शीर्षकाखाली लिहिलेल्या पत्रात त्यांनी आरोप केला की भाजप लोकांना कारागृहात टाकण्याचे राजकारण करत आहे. परंतु आम्ही मुलांना शिकवण्याचे राजकारण करत आहोत. कारागृहात पाठवणे सोपे आहे, परंतु मुलांना शिकवणे कठीण आहे. राष्ट्र शिक्षणामुळे पुढे जाईल, कारागृहात पाठवण्याने नव्हे. आज निश्चितच कारागृहाचे राजकारण यशस्वी होताना दिसत आहे, परंतु भारताचे भवितव्य शिक्षणाच्या राजकारणात आहे.

बीआरएस नेत्या कविता आज उपोषण करणार
नवी दिल्ली/हैदराबाद :
बीआरएस नेत्या आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या कविता महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ शुक्रवारी दिल्लीत उपोषण करतील. त्यांनी आरोप केला की सरकार ईडीचा वापर करत आहे. कारण भाजप तेलंगणात मागील दाराने प्रवेश करू शकला नाही. त्या म्हणाल्या की, मी काहीच चुकीचे केलेले नसून ईडीचा सामना करेन. अबकारी धोरणाशी संबंधित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कविता यांना ईडीने समन्स बजावला आहे.

बातम्या आणखी आहेत...