आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monkey B Virus Kills One Person In China, 80% Of Deaths After Infection, Know The Symptoms And RemediesChina Monkey B Virus | What Is Monkey B Virus Symptoms? Monkey B Virus Transmitted From Bandar To Humans​​​​​​​; News And Live Updates

कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस:चीनमध्ये 'मंकी बी' व्हायरसमुळे एका जणाचा मृत्यू, संसर्गानंतर मृत्यूचे प्रमाण 80 टक्के, जाणून घ्या याचे लक्षणे आणि उपाय

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशाप्रकारे माकडांपासून मानवांमध्ये पसरतो हा व्हायरस

कोरोना व्हायरसने जगभरात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले आहे. यामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक देशांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे जगभरातील लोक चिंतेत जगत आहे. तर दुसरीकडे चीनमधून एका नवीन व्हायरसची बातमी समोर येत आहे. 'मंकी बी' या व्हायरसमुळे चीनमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा फैलाव माकडापासून होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे चीनमधील एका पशुवैद्यकीय डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस किती धोकादायक आहे याचा अंदाज त्याच्या संसर्गानंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणावरुन होईल. याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे.

या व्हायरसमुळे एका डॉक्टराचा मृत्यू
ग्लोबल टाईम्सच्या मते, या व्हायरसमुळे बीजिंगमधील एका पशुवैद्यकीय डॉक्टराचा मृत्यू झाला असून या व्हायरसचे हे पहिलेच प्रकरण आहे. मृतक डॉक्टराच्या संपर्कात आलेले सर्व जण अद्याप सुरक्षित आहे. मृतक डॉक्टर हे 53 वर्षाचे असून ते एका संस्थेत नॉन-ह्यूमन प्राइमेट्सवर संशोधन करत होते. मार्च महिन्यात त्यांनी दोन मृत माकडांवर संशोधन केले त्यानंतर डॉक्टरामध्ये मळमळ आणि उलटी हे प्राथमिक लक्षण दिसून आले. त्यांच्यावर अनेक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. परंतु, 27 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मंकी बी व्हायरस काय आहे?
आयसीएमआरचे माजी सल्लागार डॉ. व्हीके भारद्वाज म्हणतात की, हर्पस बी व्हायरस किंवा मंकी बी व्हायरस हे प्रामुख्याने प्रौढ माकडांपासून संक्रमित होतात. यावितिरिक्त, हा व्हायरस रीसस मॅकॉक, डुक्करांसारखी शेपूट असणाऱ्या माकडापासून आणि सायनोमोलगस माकड किंवा लांब-शेपटी असणाऱ्या माकडांपासूनदेखील या व्हायरसचा फैलाव होतो. हा व्हायरस क्वचितचपणे माणसांमध्ये आढळून येतो. परंतु, भारतातील माकडांमध्ये हे व्हायरस सध्या अस्तिवात नाही. जर कोणताही व्यक्ती या व्हायरसने संक्रमित झाला तर त्याला मेंदूची समस्या उद्भवू शकते असे भारद्वाज यांनी सांगितले.

अशाप्रकारे माकडांपासून मानवांमध्ये पसरतो हा व्हायरस
डॉ. भारद्वाज सांगतात की, मानवांमध्ये या व्हायरसच्या संसर्गाचा धोका खूपच कमी आहे, तरीही संक्रमित माकडांशी संपर्क आल्यामुळे हा व्हायरस मानवांमध्ये येऊ शकतो.

या व्हायरसचे लक्षणे 1 महिन्याच्या आत दिसतात
मंकी बी व्हायरसचे लक्षणे एका महिन्यात किंवा 3 ते 7 दिवसात दिसतात. परंतु, याचे लक्षणे सर्वच माणसांत सारखे नसतात असे डॉ. भारद्वाज यांनी सांगितले आहे.

वेळेवर लक्षात आल्यास होऊ शकतो उपचार
या व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण 70 ते 80 टक्के असले तरी वेळेत लक्षात यावर उपचार केला जाऊ शकतो. बोस्टन पब्लिक हेल्थ कमिशनच्या अहवालानुसार, जर आपल्याला माकडाने चावा किंवा ओरखडा तरच हे व्हायरस संक्रमित होते. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रथमोपचार तातडीने सुरू करावा. साबणाने आणि पाण्याने जखमेच्या आजूबाजूच्या भागातील स्वच्छता करावी. कमिशनच्या अहवालानुसार, यावर उपचार करण्यासाठी अँटी-व्हायरल औषधे उपलब्ध आहेत. परंत, यावर सध्या कोणत्याच प्रकारची लस उपलब्ध नाही.

बातम्या आणखी आहेत...