आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेरठ:कोरोना रुग्णांच्या रक्ताचे नमुने हिसकावून पळाले माकड, नमुने चावून फोडलेही

मेरठएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॅब टेक्निशियनच्या हातातील तीन कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने माकडाने नेले पळवून

उत्तर प्रदेशातील मेरठ वैद्यकीय महाविद्यालयात लॅब टेक्निशियनच्या हातातील तीन कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने माकडाने पळवून नेले. नंतर ते माकड झाडावर जाऊन बसले. त्याने इतर माकडांसोबत तमाम परीक्षा नळ्या चावून फोडल्या. शुक्रवारी याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. यावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. के. गर्ग यांनी म्हटले, नमुने रक्ताचे होते. कोरोनाचा संसर्ग रक्तापासून पसरत नाही. यामुळे लाेकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. माकडांपासून संसर्ग पसरतो याला शास्त्रीय आधार नाही. तथापि, रक्ताचे नमुने हिसकावले जावेत इतका गलथानपणा कसा घडला? यावर ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रक्ताचे नमुने कोरोनाबाधित रुग्णांचे होते. या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांची दररोज तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले जातात. ते नमुने घेऊन टेक्निशियन लॅबकडे जात असताना त्याच्या हातातून रक्ताचे नमुने घेऊन माकड पळाले. या रुग्णांच्या रक्ताचे पुन्हा नमुने घेण्यात आले आहेत.

डॉ. गर्ग यांनी म्हटले, वैद्यकीय महाविद्यालयाने माकडांच्या उच्छादाबद्दल अनेकदा वन विभागाकडे तक्रार दिली. शेकडोच्या संख्येने आलेली माकडांची टोळी दरराेज महाविद्यालयात उच्छाद मांडते आहे. पण वन विभागाने कारवाई केलेली नाही,असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...