आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monson A Low Pressure Belt Will Form In The Bay Of Bengal, Northeast India From June 9

मान्सून:बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार, 9 जूनपासून ईशान्य भारतात

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्सून विलंबाने पण वेगवान, एकाच दिवसात तीन दिवसांचा पल्ला गाठला

केरळमध्ये दाेन दिवस विलंबाने आलेल्या मान्सूनची घोडदौड मात्र वेगवान आहे. कारण गेल्याच चोवीस तासांत तीन दिवसांची बरोबरी करेल, एवढा पल्ला मान्सूनने गाठलाय. कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या रायलसीमाचा भाग व गोव्यात मान्सूनच्या आगमनाची तारीख ५ जून आहे. त्याचदरम्यान तो येण्याची शक्यता आहे. आता लवकरच बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो आणि त्यानंतर मुसळधार पाऊस होऊ शकतो. हा कमी दाबाचा पट्टा म्यानमारच्या जवळपास ७ जून रोजी विकसित हाेईल आणि ९ ते ११ जूनदरम्यान त्याचा परिणाम आेडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, बिहार, छत्तीसगड व महाराष्ट्रातील काही भागात दिसून येईल. त्यातून माेसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल.

मान्सूनची उत्तरेकडील सीमा २७ मे रोजी मालदीव व श्रीलंकेच्या मोठ्या भागाला पार करून कोमोरिन समुद्रापर्यंत पोहोचली होती. परंतु त्यानंतर अनुकूल परिस्थिती निर्माण न झाल्याने २ जूनपर्यंत तेथेच ठप्प होता. परंतु ३ जून रोजी त्याने भारतीय भूप्रदेशात प्रवेश केला आणि त्याची वेगवान घोडदौड सुरू झाली. दोन ते तीन दिवसांत मान्सून तामिळनाडू व कर्नाटकच्या उर्वरित भागात पोहोचेल.

पावसाचे प्रमाण बदलले नाही, पुरासोबत दुष्काळही
एखाद्या दिवशी २.४ मिलिमीटरहून जास्त पाऊस झाल्यास त्याला रेनी डे म्हटले जाते. पूर्वी १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत १२२ दिवसांचा दीर्घ सरासरी (एलपीए) ८८० मिलिमीटरजवळ पाऊस पडत होता. अजूनही पावसाच्या एकूण प्रमाणात फारसा बदल झालेला नाही. आता पावसाचे दिवस ६० किंवा त्यापेक्षा कमी झाले आहेत. म्हणूनच मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते. बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यायला लागतो.

तीन दिवसांत होणारा पाऊस आता तासाभरात
स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पहलावत म्हणाले, पूर्वी केरळ व मुंबईत पूर यायचा. परंतु आता गुजरात व राजस्थानमध्ये पूर येत आहेत. भलेही पावसाच्या प्रमाणात फारसा बदल दिसत नाही. परंतु पावसाचे सरासरी दिवस कमी झाले. आता मुसळधार पाऊस होत आहे. १० वर्षांपूर्वी तीन दिवसांत होणारा पाऊस अलीकडे तीन तासांत होत आहे. पूर्वी चार महिन्यांपर्यंत नियमित पाऊसमान चालायचे. जमिनीत निचरा व्हायचा मग भूगर्भातील जलपातळी वाढायची.

१० वर्षांत भूस्खलन, गाराच्या घटनांत २० पटीने वाढ
हवामान विभागातील तज्ज्ञांनुसार ही हवामानातील उच्च स्थिती आहे. अशा स्थितीच्या घटनांत २० टक्के वाढ झाली आहे. उच्च स्थिती म्हणजे भूस्खलन, मुसळधार पाऊस, गारा पडणे, ढगफुटीच्या घटनांत वाढ झाली आहे. चक्रीवादळ, दुष्काळ, पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या वाढणे इत्यादी. १९७०-२००५ दरम्यान अशा २५० घटना घडल्या. परंतु २००५- २०२० दरम्यान ३१० अशा घटनांची नोंद झाली.

केरळ, कर्नाटक, आंध्रासह ९ राज्यांत पावसाचा इशारा
शुक्रवारी संपूर्ण केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, अंतर्गत प्रदेश, आंध्रातील रायलसीमा व तामिळनाडूत मान्सून तडाखेबाज हजेरी लावेल.९ राज्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत केरळच्या १४ पैकी ८ जिल्ह्यांत ७ ते १६ सेंमीपर्यंत पाऊस झाला. बंगळुरूमध्ये शनिवारी मान्सून पोहोचेल. गोव्यातही मान्सून ५ मेपर्यंत उत्तर सीमेत दाखल होऊ शकतो. शुक्रवारी केरळपासून गोव्यापर्यंत पावसाच्या ढगांची एक रेषा दिसून येते. कोकण, गोवा या भागात वादळी वाऱ्याचे क्षेत्र तयार झाले .

बातम्या आणखी आहेत...