आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Monsoon Arrives Across The Country For The First Time Since 2013 Two Weeks In Advance

मान्सून:2013 नंतर प्रथमच दोन आठवडे अगोदर देशभर पोहोचला मान्सून, नव्या निकषांच्या आधारे मान्सूनची नवी तारीख घोषित

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून केरळमध्ये यंदा लवकर दाखल झाला

नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून यंदा नियोजित वेळेपेक्षा दोन आठवडे आधीच संपूर्ण देशभर पोहोचला आहे. साधारणपणे १ जूनला केरळ किनारपट्टीवर दाखल झाल्यावर राजस्थानात श्रीगंगानगर येथे पोहोचण्यास मान्सूनला ४५ दिवस लागतात. हे मान्सूनच्या वाटचालीत देशाचे शेवटचे टोक आहे.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, २०१३ नंतर प्रथमच मान्सून इतक्या वेगाने देशभर पोहोचला आहे. साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो देशाच्या बहुतांश भागांत दाखल झालेला असतो. यंदा अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झाला. तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्याची वाटचाल वेगाने झाली.

मान्सूनची नवी तारीख घोषित : मान्सून देशभर दाखल होण्याची तारीख या वर्षीपासून नव्या निकषांच्या आधारे बदलण्यात आली आहे. यानुसार श्रीगंगानगर येथे मान्सून दाखल होण्याची तारीख या वर्षीपासून ८ जुलै असेल.

0