आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Monsoon Favors Nation Maharashtra! 1% More Rain In 2 Months, Average In Next 2 Months

दिव्य मराठी विशेष:राष्ट्र-महाराष्ट्रावर मान्सून मेहेरबान! 2 महिन्यांत 1% जास्त पाऊस, पुढील 2 महिन्यांत सरासरीइतका

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान खात्याने मान्सूनचा दीर्घावधी अंदाज केला जाहीर

देशातील ४ महिन्यांच्या मान्सूनचे पहिले दोन महिने शुक्रवारी पूर्ण झाले. या काळात देशासह महाराष्ट्रावरही मान्सून मेहेरबान असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. देशात सरासरीपेक्षा १ टक्का जास्त तर महाराष्ट्रात ५ टक्के जास्त मान्सून बरसला आहे. भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी ऑगस्ट-सप्टेंबरसाठी आपला अंदाज जारी केला. त्यानुसार, ऑगस्टमध्ये ९७% पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन महिन्यांत देशभरात १०४ टक्के पावसाची शक्यता आहे. तथापि, त्यात ८% पेक्षा जास्त वा वाढ होऊ शकते. यंदा केरळमध्ये मान्सूनने वेळेवर १ जूनला वर्दी दिली होती.

येथे ३% कमी पाऊस
गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दमण-दीव.

येथे १९% कमी पाऊस
राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, केंद्रशासित प्रदेश चंदीगड, दिल्ली.

येथे अधिक बरसला
महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, झारखंड, मेघालय, नागालँड, मणिपूर व मिझोराम. जम्मू-काश्मिरात ५०% व लडाखमध्ये ५९% कमी पाऊस झाला आहे.

आसाम व बिहारमध्ये ओसरू लागला पूर
- आसाममध्ये पुराचे पाणी ओसरू लागले आहे. येथे पुरात तब्बल १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १३६६ गावांत पुराचे पाणी आहे. राज्यात १०.८२ लाख लोकांना फटका बसला आहे.
- बिहारमध्ये ३८.४७ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील गंडक नदीला महापूर आला असून मुझफ्फरपूर जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी तुंबलेले आहे.