आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचे आगमन:तीन दिवस आधीच मान्सूनची चाहूल, 28 पर्यंत केरळात येण्याची शक्यता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यानंतर मिळालेला एकमेव लाभ

गुजरात आणि महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांत तौक्ते वादळामुळे प्रचंड नुकसान झाले. याचा अंदाज घेतला जात असतानाच या वादळाने झालेला एकमेव लाभही सांगता येईल. तो म्हणजे वादळामुळे मान्सून नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच म्हणजे २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

हवामान तज्ज्ञांनुसार, या वादळाने मान्सूनचे ढग भारतापर्यंत खेचून आणले आहेत. त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून शुक्रवारीच अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. साधारणपणे अंदमानवरून केरळपर्यंत मोसमी पावसाचा प्रवास १२ दिवसांपर्यंतचा असतो. मात्र, तौक्ते वादळामुळे सातव्या दिवशीच तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या तीन-चार दिवसांत अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.

तौक्ते वादळाचा प्रभाव ओसरला : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाचा प्रभाव गुरुवारी पूर्ण ओसरला. राजस्थानात पाऊस उघडला आहे, तर पश्चिमी विक्षोभामुळे उत्तराखंड व हिमाचलमध्ये पाऊस पडला.

बंगालच्या उपसागरात नवे वादळ : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २३ मे रोजी ते वादळात रूपांतरित होऊ शकते. २६ मे रोजी ते ओडिशा व प. बंगालपर्यंत दाखल होईल. मात्र, तौक्ते वादळाइतके ते शक्तिशाली नाही. या वादळास ओमानने “यास’ नाव दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...