आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Likely To Arrive In Kerala Tomorrow; According To The Meteorological Department; News And Live Updates

नवी दिल्ली:केरळमध्ये उद्या मान्सूनच्या आगमनाची शक्यता; हवामान खात्यानुसार असे असतात मान्सूनचे निकष

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • कोझिकोड किनारपट्टीवर असे नभ दाटून आले होते.

दोन दिवसांपासून मान्सून केरळ व कन्याकुमारीजवळ मुक्कामी आहे. हवामान खात्यानुसार, मान्सूनचे आगमन ३१ मे वा दुसऱ्या दिवशी होऊ शकते. मात्र या घोषणेसाठी काही निकष पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा आहे. केरळात सामान्यपणे १ जूनला मान्सून येतो. अंदमान-निकोबारमध्ये मान्सून २१ मे रोजीच दाखल झाला होता. यानंतर बंगालचा उपसागर व हिंद महासागरात सामान्य वेगाने तो पुढे सरकत होता.

सध्या आहे अशी स्थिती
पाऊस, हवा व जमिनीवरून आकाशाकडे जाणाऱ्या विकरणचे निकष सलग २ दिवस पूर्ण झाल्यास आगमनाला दुजोरा मिळतो. २ दिवसांपासून पावसाचा निकष पूर्ण होत आहे. मात्र वाऱ्याचा वेग व जाडीचे निकष पूर्ण नाहीत. ढगही विखुरलेले असल्याने विकरणाचेही निकष अपूर्ण आहेत.

हवामान खात्यानुसार असे असतात मान्सूनचे निकष

  • केरळ, लक्षद्वीप व कर्नाटकच्या १४ हवामान केंद्रांपैकी ६०% मध्ये १० मे नंतर सलग दोन दिवस २.५ मिमी पाऊस.
  • किनारपट्टीवर ३० ते ३५ किमी वेगाने पश्चिमेकडून वारे वाहायला पाहिजे.
  • वाऱ्याची जाडी भूपृष्ठापासून ३ ते चार किमी उंचीवर असावी.
  • ढग इतके दाट असावेत की जमिनीहून परतणारे विकरण २०० वाॅट प्रतिवर्गमीटरपेक्षा कमी असावे.
बातम्या आणखी आहेत...