आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Moves North, Heavy Rains In The State; Rain prone Districts; News And Live Updates

वाटचाल मान्सूनची:मान्सून उत्तरेकडे सरकला, राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पावसाची शक्यता असलेले जिल्हे

​​​​​​​नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • यूपी-गुजरातच्या 3 जिल्ह्यांत 6 दिवस रेंगाळल्या चार राज्यांच्या पाऊसधारा
  • मान्सूनचा 3 जूनलाच प्रवेश झाला खरा, परंतु पश्चिमी वाऱ्यांनी मार्गक्रमण रोखले

देशाच्या ८० टक्के भागांत मान्सून १२ जूनलाच पोहोचला होता. मात्र अचानक यूपीच्या सहारनपूर, पिलीभीत जिल्हे आणि गुजरातच्या सुरतेत मान्सूनचे वारे ६ दिवस अडखळले. यामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीत मान्सून वर्षावास विलंब झाला. मान्सून वाऱ्यांच्या विपरीत दिशेने वाहणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळेे हा प्रकार घडला. दोन्ही बाजूंच्या वाऱ्यांतील हा सामना ६ दिवस चालला. शुक्रवारी मान्सून पुन्हा मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली. देशात मान्सूनने ३ जूनला प्रवेश केला. हवामान वैज्ञानिकांनी सांगितले की, मान्सून अडखळला नसता तर १३ वा १४ दिवसांत तो देशभरात पोहोचला असता. हाही एक विक्रम असता.

मोसमी वाऱ्यांनी सर्वात कमी वेळेत देश व्यापलेली वर्षे

  • हवामान खात्यानच्या आजवरच्या रेकॉर्डनुसार, मान्सून देशभरात सक्रिय होण्यात सरासरी ४५ दिवस लागले आहेत.
  • २०२० मध्ये हवामान खात्याने मान्सून कॅलेंडरमध्ये सुधारणा करून मान्सून देशभरात पोहोचण्याचा अवधी ४५ दिवसांवरून घटवून ३८ दिवस केला होता.
  • म्हणजे, मान्सूनने जर ८ जुलैपूर्वी संपूर्ण देश व्यापला तर ही चांगली स्थिती असल्याचे समजले जाईल.

मोसमी वाऱ्यांची आता राजस्थानकडे वेगाने आगेकूच
{मान्सून ११ जूनला सुरत, दीवला पोहोचला होता. प्रतिकूल वाऱ्यांमुळे ६ दिवस तेथेच अडखळला. शुक्रवारी मान्सूनला अनुकूल वारे वाहिले. पुन्हा मान्सून वारे सौराष्ट्र, दक्षिण-पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागांकडे वाहत आहेत.

मान्सून उत्तरेकडे सरकला, राज्यात पावसाचा जोर ओसरणार
औरंगाबाद | सहा दिवसांपासून गुजरात, मध्य प्रदेशात रेंगाळलेला मान्सून शुक्रवारी उत्तरेकडे सरकला. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे. राज्यात दि. १९ ते २२ जून या काळात कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर विदर्भ व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रातील मान्सूनची सक्रिय शाखा आता मंदावली आहे. परिणामी राज्यात या आठवड्यात पावसाचा जोर कमी राहील, अशी शक्यता आयएमडीने वर्तवली.

पावसाची शक्यता असलेले जिल्हे
कुलाबा वेधशाळेनुसार राज्यात १९ ते २२ जूनदरम्यान विदर्भ, कोकणात चांगला पाऊस तर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा व संपूर्ण विदर्भासाठी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...